Karnal Lathi Charge: शेतकऱ्यांची डोकी फोडण्याचा आदेश देणाऱ्या कर्नालच्या SDM वर उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला, म्हणाले..
Karnal Lathi Charge: हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला म्हणाले की, आयएएस अधिकाऱ्याकडून शेतकऱ्यांसाठी अशा शब्दांचा वापर निंदनीय आहे. नक्कीच कारवाई केली जाईल.
Karnal Lathi Charge: कर्नाल एसडीएमच्या व्हायरल व्हिडिओवर हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला म्हणाले की, अधिकाऱ्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. चौटाला म्हणाले की, आयएएस अधिकाऱ्याने शेतकऱ्यांसाठी अशा शब्दांचा वापर निंदनीय आहे. त्याच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल. कर्नालचे एसडीएम आयुष सिन्हा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात ते पोलिसांना आंदोलक शेतकऱ्यांचे डोके फोडण्यास सांगत आहेत.
दुष्यंत चौटाला म्हणाले की, एका स्पष्टीकरणात त्यांनी (कर्नालचे एसडीएम आयुष सिन्हा) सांगितले की ते गेल्या दोन दिवसांत झोपले नाहीत. त्यांना कदाचित माहित नसेल की शेतकरी सुद्धा वर्षात 200 दिवस झोपत नाहीत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एसडीएमची प्रतिक्रियाही समोर आली आहे. आयुष सिन्हा म्हणाले की, अनेक ठिकाणी दगडफेक सुरू झाली होती. ब्रीफिंग दरम्यान, बळाचा प्रमाणात वापर करा असे सांगितले गेले.
The use of such kind of words by an IAS officer for farmers is condemnable. Definitely, action will be taken against him: Haryana Deputy CM Dushyant Chautala on viral video purportedly showing Karnal SDM Ayush Sinha asking policemen to crack the heads of protesting farmers https://t.co/DbPZkXQRgS pic.twitter.com/x9Z4Y1RlgZ
— ANI (@ANI) August 29, 2021
दुसरीकडे, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी कर्नालमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांच्या कारवाईचा बचाव करताना सांगितले की, शांततापूर्ण आंदोलनाचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आणि एक महामार्ग रोखण्यात आला. शनिवारी भाजपच्या सभेच्या निषेधार्थ राष्ट्रीय महामार्गावर कर्नालच्या दिशेने जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या गटावर पोलिसांनी कथितरीत्या लाठीमार केल्याने सुमारे 10 लोक जखमी झाले.
बैठकीनंतर शनिवारी संध्याकाळी कर्नालमध्ये पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री खट्टर म्हणाले की, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी यापूर्वी सरकारला आश्वासन दिले होते की त्यांचे आंदोलन शांततेत होईल. खट्टर म्हणाले, "जर त्यांना निषेध करायचा होता, तर त्यांनी तो शांततेने करायला हवा होता, कोणालाही त्यावर आक्षेप नाही. यापूर्वी त्यांनी शांततापूर्ण आंदोलनाचे आश्वासन दिले होते. पण जर त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली, महामार्ग रोखले तर पोलीस कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पावले उचलतील. कर्नालमध्ये भाजपच्या बैठकीचा संदर्भ देत ते म्हणाले की ही पक्षाची राज्यस्तरीय बैठक होती आणि "शेतकरी संघटनांनी त्याला विरोध करण्यासाठी केलेल्या आवाहनाचा मी निषेध करतो".