एक्स्प्लोर

प्रेयसीला प्रियकराने पळवून नेलं, दीड वर्षांनी कारसह मृतदेह आढळले

अंबालामध्ये राष्ट्रीय महामार्गाजवळ खोदकाम करताना दलदलीत कार आढळली. त्यामध्ये अंजू आणि नरेश यांचे मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे

चंदिगढ : कारमधून पळून गेलेल्या प्रियकर-प्रेयसीचा तब्बल दीड वर्षाने शोध लागला, मात्र दुर्दैवाने त्यावेळी दोघंही जिवंत नव्हते. हरियाणातील अंबालामध्ये राष्ट्रीय महामार्गाजवळ खोदकाम करताना दलदलीत एक कार आढळली असून यामध्ये नरेश आणि अंजू यांचे मृतदेह सापडले. नरेश आणि अंजू या दोघांचीही वेगवेगळी लग्नं झाली होती. मात्र दोघांचेही प्रेमसंबंध असल्याची माहिती आहे.  7 जुलै 2016 रोजी 46 वर्षांचा नरेश 38 वर्षांच्या अंजूला कारमध्ये बसवून पळवून घेऊन गेला. त्या दिवसापासून दोघं बेपत्ता होते. कुटुंबीयांनी शोध घेतला, पोलिसात तक्रारही नोंदवली. अखेर, दोघांनी आपला नवा संसार थाटला असेल, अशा विचाराने दोघांच्या कुटुंबीयांनी नाद सोडला. शनिवारी अंबालामध्ये राष्ट्रीय महामार्गाजवळ खोदकाम करताना दलदलीत कार आढळली. त्यामध्ये अंजू आणि नरेश यांचे मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. सोबतच अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत. दोघांचे प्रेमसंबंध कुटुंबीयांना मान्य नसल्यामुळे काही गावकरी त्यांच्या मृत्यूचा संबंध ऑनर किलींगशी जोडत आहेत. पोलिसांनी मात्र हा अपघात असल्याचा अंदाज वर्तवला आहे. अंबाला-जगाधरी मार्गाचं चौपदरीकरण केलं जात आहे. हा आधी एकेरी मार्ग होता. रस्ता रुंदीकरणासाठी खोदकाम करताना दलदलीत कार सापडली. कारमध्ये दारु, पाण्याची बाटली, जग अशा काही वस्तू आढळल्या आहेत. गाडीची नंबरप्लेट आणि मृतदेहाच्या खिशातील कागदपत्रांवरुन त्यांची ओळख पटवण्यात आली. नरेशच्या मुलाने आपल्या वडिलांच्या वर्तनामुळे लाज वाटत असल्याचं सांगितलं. चार वर्षांपूर्वीच आपण त्यांच्याशी नातं तोडल्याचा दावा त्याने केला. मात्र वडिलांचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी होकार दिला आहे. नरेश यांना चार मुलं आणि एक मुलगी आहे. त्यापैकी कोणाचंही लग्न झालेलं नाही. 46 वर्षीय नरेश शेती करत असत. नरेश यांचं आपल्या घरी येणं-जाणं असल्याचा 38 वर्षीय अंजू यांच्या अल्पवयीन मुलीने सांगितलं. 7 जुलै 2016 च्या संध्याकाळी नरेश कार घेऊन घराच्या गल्लीजवळ आले. त्यावेळी आई कपडे धूत होती. नरेश सरळ घरात घुसले आणि आईला जबरदस्ती कारमध्ये बसवून निघून गेले, असं तिने सांगितलं. अंजू यांच्या कुटुंबीयांनी कारचा पाठलागही केला, मात्र त्यांना कोणीही पकडू शकलं नाही. दोघांचा काहीच थांगपत्ता लागला नाही. पोलिसातही त्याची तक्रार देण्यात आली. अंजू यांचं वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजे 18 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोन वर्षांपूर्वी अंजू यांच्या पतीला अपघात झाला होता. त्यामुळे मुलगाच त्यांचा कमवता आधार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Embed widget