Sisters Day 2021: एक हज़ारों में मेरी बहना है! 'सिस्टर्स डे' च्या निमित्ताने माना बहिणीचे आभार
Happy Sisters Day 2021 : आज सर्वत्र 'सिस्टर्स डे' साजरा करण्यात येतोय. त्या निमित्ताने सर्वांनी आपल्या बहिणीचे आभार मानण्याची संधी दवडू नका.
Sisters Day 2021 : आईनंतर शेवटच्या श्वासापर्यंत निस्वार्थ प्रेम करणारं कुणी असेल तर ती म्हणजे बहिण असते असं म्हटलं जातं. आई असताना आणि ती नसतानाही बहिण आपल्या भावंडांची ज्या पद्धतीने काळजी घेते त्याला तोडच नसते. म्हणूनच बहिणीचं प्रेम मिळणं ही भाग्याची गोष्ट समजली जाते. आपल्या आयुष्यातील बहिणीच्या योगदानाचे आभार मानण्यासाठी, तिच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आज 'सिस्टर्स डे' साजरा केला जातोय.
दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी 'सिस्टर्स डे' साजरा करण्यात येतोय. त्या निमित्ताने आपल्या प्रत्येक सुखात साथ देणारी आणि दु:खात पाठीशी खंबीरपणे राहणाऱ्या बहिणीचे आभार मानले जाते. भाऊ- बहिण किंवा बहिणी-बहिणींचे नाते हे सुंदर आणि हळवे असते. बहिण जर मोठी असेल तर ती आपली संपूर्ण जबाबदारी स्वीकारते आणि बहिण जर लहान असली तरीही ती तीच भूमिका घेते. बहिण असेल तर आपण तिला हक्काने कधीही बोलू शकतो, आपल्या मनातील सर्व गोष्टी तिच्याशी शेअर करु शकतो.
बहिणीसोबत असणारं आपलं नातं हे जगातील सर्वात सुंदर नातं असल्याचं सांगितलं जातं. बहिण आपल्याशी कधी-कधी भांडते, रुसते पण आपल्यावर ती जीव ओवाळून टाकते. म्हणूनच बहिणीचं नातं हे एकदम घट्ट असतं. एखाद्याला बहिण असणं म्हणजे भाग्याची गोष्ट समजली जाते.
तसं पाहिलं तर बहिणीचे आभार मानण्यासाठी केवळ एकच दिवस पुरेसा नाही. पण आजचा दिवस काही खासच आहे. त्यामुळे आजच्या दिवशी तिचे आभार मानण्याची आणि तिच्याबद्दल आदर व्यक्त करण्याची संधी दवडू नका.
'सिस्टर्स डे' साजरा करायला कशी सुरुवात झाली?
'सिस्टर्स डे' साजरा करण्यास अमेरिकेत सुरुवात झाल्याचं सांगण्यात येतंय. अमेरिकेतील डेबोराह टॅनेन या व्यक्तीने सिस्टर्स डे साजरा करायला सुरुवात केली. त्यानंतर सर्व अमेरिकेत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी सिस्टर्स डे साजरा करायला सुरवात झाली.
संबंधित बातम्या :