एक्स्प्लोर

दोघं म्हणाले लग्न झालं, म्हणजे झालं, कोर्टाचा हादियाला दिलासा

लव्ह जिहादच्या प्रकरणात एनआयए चौकशीचे आदेश मागे घेण्याबाबत कोर्टाने काहीही सांगितलेलं नाही.

नवी दिल्ली : आपलं लग्न झालं आहे, असं युवक आणि युवती दोघंही सांगत असतील, तर लग्नाच्या वैधतेची चौकशी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं सांगत सुप्रीम कोर्टाने हादिया आणि शफिनला दिलासा दिला आहे. मुस्लिम तरुणाशी लग्न केल्यामुळे केरळच्या हादिया या तरुणीच्या पालकांनी केरळ हायकोर्टात धाव घेऊन दोघांचं लग्न रद्द करण्याची मागणी केली होती. केरळच्या हादियाने शफिन जहाँ या मुस्लिम तरुणाशी लग्न केलं होतं. हे 'लव्ह जिहाद'चं प्रकरण असल्याचं सांगत ओमानहून परतलेल्या हादियाच्या पालकांनी केरळ हायकोर्टात धाव घेतली होती. हादियाचं लग्न रद्द करण्याची मागणी तिच्या पालकांनी केली होती. गेल्या वर्षी हायकोर्टाने हादियाच्या पालकांच्या बाजूने निकाल दिला. मे महिन्यात केरळ हायकोर्टाने हादियाचं लग्न रद्द ठरवून तिला पालकांकडे जाण्याचे आदेश दिले होते. हादियाचा पती शफिनने सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. हादिया सज्ञान असून तिला जोडीदार निवडण्याचा अधिकार असल्याचं त्याने सांगितलं. त्यानंतर आज सुप्रीम कोर्टात या केसवर सुनावणी झाली. पुढील सुनावणी 22 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 'आपलं लग्न झालं आहे, असं युवक आणि युवती दोघंही सांगत असतील, तर चौकशी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही कोणत्याही गोष्टीची चौकशी करु शकता, मात्र एखाद्याच्या लग्नाची वैधता किंवा मॅरिटल स्टेटसबाबत नाही. हे प्रकरण फौजदारी कारवाईच्या कक्षेत येता कामा नये. अन्यथा हे भविष्यात वाईट उदाहरण ठरेल.' असं चीफ जस्टिस दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने सांगितलं. 'कोर्ट लग्न रद्द करु शकतं का, याचा आम्ही तपास करु शकतो. लग्न कायदेशीर आहे की नाही, यावर आम्ही प्रश्न उपस्थित करु शकत नाही. कोण चांगलं आहे आणि कोण वाईट हे हादिया ठरवेल' असं न्यायाधीशांनी सांगितलं. लव्ह जिहादच्या प्रकरणात एनआयए चौकशीचे आदेश मागे घेण्याबाबत कोर्टाने काहीही सांगितलेलं नाही. हादियाचं ब्रेनवॉश करुन तिला धर्मांतराची जबरदस्ती करण्यात आली आहे, तिला सीरियाला नेण्यात येणार आहे, असा दावा तिच्या पालकांनी केला होता. नोव्हेंबर महिन्यात सुप्रीम कोर्टाने हादियाची तिच्या पालकांपासून सुटका केली होती. लग्नापूर्वी ती शिकत असलेल्या तामिळनाडूतील कॉलेजमध्ये शिक्षण सुरु ठेवण्याची परवानगी तिला देण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget