H3N2 Symptoms 2023: बदलणाऱ्या वातावरणात वेगानं पसरतोय H3N2 व्हायरस; ताप अन् खोकल्यानं हैराण झालेयत लोक
H3N2 Cases: सध्या देशात H3N2 व्हायरसनं अनेकजण हैराण झाले आहेत. सर्दी, ताप, खोकल्यावर औषध घेऊनही अनेकांना काहीच फरक पडत नाहीये.
H3N2 Cases: बदलत्या हवामानामुळे सध्या अनेकांना सर्दी, ताप, खोकला (Cough) अशा समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. जर तुमच्यातही ही तीन लक्षणं असतील आणि ती बऱ्याच काळापासून असतील तर सावध व्हा कारण इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नं दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या ताप आणि खोकल्याचा उद्रेक हा इन्फ्लूएंझा A चा H3N2 व्हायरसमुळे झाला आहे.
ICMR च्या मते, H3N2 इतर व्हायरसपेक्षा जास्त प्रभावी आहे. या व्हायरसने त्रस्त असलेले लोक मोठ्या प्रमाणात रुग्णालयात दाखल होत आहेत. ICMR मधील एपिडेमियोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. निवेदिता यांच्या मते, 15 डिसेंबर 2022 पासून, 30 VRDLS च्या डेटानं इन्फ्लूएंझा A एच3एन2 व्हायरसच्या (H3N2 Virus) रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
पाहा व्हिडीओ : IMA on Antibiotics : सर्दी - खोकल्यावर अँटीबायोटिक्स देणं टाळा, आयएमएकडून देशभरातील डॉक्टारांना सूचना
व्हायरस कमी होण्याची चिन्ह
डॉ. निवेदिता म्हणाल्या की, मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून तापमान वाढू लागल्यानं विषाणूचा प्रभाव कमी होण्याची चिन्ह आहेत. त्याचबरोबर तज्ज्ञांच्या मते, व्हायरसनं त्रस्त असलेल्या रुग्णांनी अॅन्टीबायोटिक्सचा अतिवापर टाळावा आणि त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
92 टक्के रुग्णांमध्ये ताप
ICMR च्या मते, हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या H3N2 रुग्णांपैकी 92 टक्के रुग्णांना ताप, 86 टक्के रुग्णांना खोकला, 27 टक्के श्वासोच्छवास आणि 16 टक्के अस्वस्थ वाटतं. याशिवाय, संस्थेच्या निरीक्षणात असं आढळून आलं की, अशा रुग्णांपैकी 16 टक्के रुग्णांना न्यूमोनिया आणि 6 टक्के रुग्णांना अस्वस्थ वाटून श्वास घेण्यास त्रासही होतो. तसेच, ICMR नं सांगितलं आहे की, H3N2 व्हायरसनं ग्रस्त असलेल्या गंभीर रूग्णांपैकी सुमारे 10 टक्के रूग्णांना ऑक्सिजनची गरज आहे आणि 7 टक्के रूग्णांना काळजीसाठी ICU मध्ये दाखल करण्यात आलं आहे.
दरवर्षी 30-50 लाख केसेस
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, संपूर्ण जगात दरवर्षी या हंगामी इन्फ्लूएंझा विषाणूची 30-50 लाख प्रकरणे नोंदवली जातात. त्यापैकी 2.9 ते 6.5 लाख लोकांचा मृत्यू श्वसनाच्या आजारांमुळे होतो. डब्ल्यूएचओ म्हणणं आहे की, लसीकरण हा रोग टाळण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग आहे.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )