एक्स्प्लोर

Gyanvapi Case : मोठी बातमी! ज्ञानवापी मशीद तळघरात हिंदू पक्षकारांना पूजा करण्याचा अधिकार

Gyanvapi Case : वाराणसीतील ज्ञानवापी तळघरात ही पूजा होणार आहे. जिल्हा न्यायालयाने हा आदेश दिला आहे. हिंदू याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल देण्यात आला.

Gyanvapi Case : ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi Case) तळघरात हिंदू पक्षकारांना पूजा करण्याची परवानगी जिल्हा कोर्टाने दिली आहे. पुरात्व विभागाच्या सर्वेक्षणात मशिदीच्या परिसरात मंदिर असल्याचे  पुरावे सापडले होते. व्यास कुटुंबीयांना मशिदीच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.   

वाराणसीतील ज्ञानवापी तळघरात ही पूजा होणार आहे. जिल्हा न्यायालयाने हा आदेश दिला आहे. हिंदू याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल देण्यात आला. हिंदू पक्षकारांचे वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितले की,व्यास कुटुंबीय आता तळघरात पूजा करणार आहेत. हिंदू पक्षाने व्यासजींच्या तळघरात पूजा करण्याची परवानगी मागितली होती. सोमनाथ व्यास यांचे कुटुंब 1993 पर्यंत तळघरात पूजा करत होते. 1993 नंतर तत्कालीन राज्य सरकारच्या आदेशावरून तळघरातील पूजा बंद करण्यात आली. 

17 जानेवारी रोजी व्यासजींचे तळघर जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतले. एएसआयच्या सर्वेक्षणाच्या कारवाईदरम्यान तळघर स्वच्छ करण्यात आले. काशी विश्वनाथ ट्रस्ट अंतर्गत तळघरात पूजा केली जाणार आहे.

'एबीपी न्यूज'शी बोलताना विष्णू शंकर जैन म्हणाले की, तिथे नियमित पूजा केली जाणार आहे. आज आमच्या बाजूने निर्णय झाल्याचे फिर्यादीचे वकील सुभाष नंदन चतुर्वेदी यांनी सांगितले. 1993 मध्ये स्थगित करण्यात आलेली पूजा पुन्हा सुरू करण्याची आमची मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. आता रोज पूजा सुरू होईल. हिंदू बाजूने दाखल केलेल्या आणखी एका अर्जावर, वाराणसी जिल्हा न्यायालयाने आज आपला आदेश दिला आणि ज्ञानवापी  मशिदीच्या परिसरात असलेल्या व्यासजींच्या तळघरात पूजेची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.

नंदीच्या समोरून जाणार तळघरात रस्ता 

वाराणसी कोर्टाच्या निकालानंतर नंदीच्या समोरून  व्यासजीच्या तळघरात जाण्याचा मार्ग तयार करण्यात येणार आहे. कोर्टाच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर कारवाई करण्यात येणार आहे. कोर्टाने सात दिवसांच्या आत  वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पूजेची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. 

अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोटीस बजावली

दुसरीकडे, अलाहाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी राखी सिंहच्या पुनर्विचार याचिकेवर ज्ञानवापी मशिदीच्या अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीला नोटीस बजावली. वाराणसी कोर्टाने ज्ञानवापी मशीद परिसरातील कथित शिवलिंग वगळता वजुखानाचे सर्वेक्षण करण्यास भारतीय पुरात्व विभागाला सर्वेक्षण करण्यास मनाई केली होती. त्या निर्णयाला याचिकाकर्त्या राखी सिंह यांनी आव्हान दिले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Ranchi Protest : मोठी बातमी, JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा मोठा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget