एक्स्प्लोर

Housing : कोण म्हणतंय मंदी आहे? गुरुग्राममध्ये अवघ्या तीनच दिवसात 7,200 कोटी रुपयांच्या 1,113 आलिशान घरांची विक्री, अनिवासी भारतीयांची मोठी गुंतवणूक

Luxury Housing : देशात दीर्घकाळापासून आलिशान घरांची मागणी झपाट्याने वाढत आहे. असंच एक दृश्य गुरूग्राममध्ये पाहायला मिळाले. या ठिकाणच्या आलिशान गृहनिर्माण प्रकल्पात लोकांनी मोठी खरेदी केली.

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून देशात आलिशान घरे आणि व्हिला यांची मागणी झपाट्याने वाढत आहे आणि याचीच प्रचीती गुरूग्राममध्ये दिसून आली. या शहरातील एका आलिशान गृहनिर्माण प्रकल्पातील सर्व घरं ही अवघ्या तीन दिवसात सर्व घरे विकली गेली. हा प्रकल्प प्री-लाँच टप्प्यातच पूर्णपणे विकला गेला. लोकांनी अवघ्या 3 दिवसांत 7200 कोटींची आलिशान घरे खरेदी केली. विशेष म्हणजे गुरूग्रामच्या या प्रकल्पात अनिवासी भारतीयांनीही खूप पैसा गुंतवला आहे.

डीएलएफचा प्रकल्प (DLF Gurugram Luxury Housing) 

हा प्रकल्प रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनी DLF ने सादर केला आहे. गुरुग्राममध्ये असलेला हा प्रकल्प प्री-लाँचच्या 3 दिवसांत विकला गेला. गृहनिर्माण क्षेत्रातील प्रचंड मागणीचा कंपनीला खूप फायदा झाला. DLF ने या प्रकल्पात 7,200 कोटी रुपयांचे 1,113 लक्झरी अपार्टमेंट विकले आहेत.

स्टॉक एक्सचेंजला दिलेली माहिती

कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला पाठवलेल्या माहितीत म्हटले आहे की गुरुग्राममध्ये आपला नवीन लक्झरी निवासी प्रकल्प 'डीएलएफ प्रिवाना साऊथ' (Gurugram Luxury Housing ) औपचारिकपणे लॉन्च करण्यापूर्वी 7,200 कोटी रुपयांच्या फ्लॅटची विक्री केली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये डीएलएफने तीन दिवसांत 8,000 कोटी रुपयांपेक्षा किमतीची 1,137 लक्झरी फ्लॅट्स विकले होते. 

DLF ने 'DLF Privana South' नावाचा नवीन प्रकल्प सुरू केला आहे. हे गुरुग्रामच्या सेक्टर 76 आणि 77 मध्ये 25 एकरमध्ये पसरलेले आहे. डीएलएफने सांगितले की, या प्रकल्पाच्या प्री-लाँच टप्प्यात 72 तासांच्या आत सर्व अपार्टमेंट विकले गेले आहेत.

फोर बीएचके अपार्टमेंट आणि पेंटहाऊस असतील

मनीकंट्रोलने दिलेल्या एका वृत्तानुसार, या प्रकल्पात 7 टॉवरमध्ये 1,113 आलिशान घरे असतील. यामध्ये 4 BHK अपार्टमेंट आणि पेंटहाऊसचा समावेश आहे. DLF होम डेव्हलपर्स लिमिटेडचे ​​संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि चीफ बिझनेस ऑफिसर आकाश ओहरी यांनी सांगितले की, प्री-लाँच सेलमधील सर्व फ्लॅटची जलद विक्री DLFच्या आलिशान गृहनिर्माण प्रकल्पांची मागणी वाढत असल्याचे दर्शवते. मोठ्या प्रमाणात बुकिंग रोखण्यासाठी, प्रत्येक खरेदीदाराला फक्त एक युनिट आणि बुकिंग रक्कम 50 लाख रुपये देण्यात आली होती. तर उद्योग मानक रुपये 10 लाख आहे. पण आम्ही जास्त पैसे घेतले. सुमारे 25 टक्के विक्री अनिवासी भारतीयांच्या माध्यमातून झाली.

गुरुग्राममधील या घरांच्या विक्रीमुळे मात्र गृहनिर्माण क्षेत्रात प्रचंड मागणी असल्याचं स्पष्ट होतंय.

ही बातमी वाचा:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ice Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP MajhaManoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Kolhapur Viral Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Embed widget