Guru Purnima 2021 : गुरु: साक्षात् परब्रह्म! जाणून घ्या का साजरी केली जाते गुरुपौर्णिमा
Guru Purnima 2021 : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या आयुष्याला आकार देण्यामध्ये हातभार लावलेल्या गुरुंचे स्मरण करुन त्यांना वंदन करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीमध्ये आहे.
मुंबई : हिंदू संस्कृतीत गुरूला नेहमीच उच्च स्थान देण्यात आले आहे. लोक गुरूला देवासारखे पूजनीय मानतात. गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा ही आपल्या गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी केली जाते. गुरु हा एक संस्कृत शब्द आहे, ज्याचा शाब्दिक अर्थ असा आहे की जो आपले अज्ञान दूर करतो आणि आपल्याला ज्ञानाच्या प्रकाशाने प्रकाशित करतो. आषाढ महिन्यातील पौर्णिमा हा हिंदू धर्मातील वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक आहे.
वेदव्यास ऋषींचा जन्म गुरुपौर्णिमेच्या दिवशी झाला असे मानले जाते. अनेक पुराण, वेद आणि महाभारतासारख्या काही महत्त्वाच्या हिंदू ग्रंथांच्या लेखकत्वाचे श्रेय वेद व्यासांना दिले जाते.
भारतात गुरुला ब्रम्हा, विष्णू आणि महेशाचं रुप समजलं जातं. गुरु हा साक्षात परब्रमह्म असल्याचं सांगितलं जातं. त्या निमित्ताने देशभरातील शाळांत हा सण साजरा केला जातो. या वर्षी गुरुपौर्णिमा ही 24 जुलैला साजरी करण्यात येणार आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, त्या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुप्रति सन्मान व्यक्त करतात.
प्राचीन भारतातील सर्वात आदरणीय गुरूंपैकी एक वेद व्यास यांच्या सन्मानार्थ गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. वेदव्यासांनी हिंदू संस्कृतीतील चार वेदांची रचना केली, महाभारताची रचना केली, अनेक पुराणांचा तसेच हिंदू संस्कृतीच्या पवित्र ज्ञानाचा मोठा ज्ञानकोशांचा पाया घातला हेही आधुनिक संशोधनांनी सिद्ध केले आहे. गुरु पौर्णिमा हा दिवस दर्शवतं ज्या दिवशी भगवान शिव यांनी सात ऋषींना आदिगुरू किंवा मूळ गुरू म्हणून प्रबोधन केले, जे सर्व वेदांचे द्रष्टा होते. योगसूत्रांमध्ये प्रणव किंवा ओमच्या रूपातील देवाला योगाचे आदिगुरू म्हटले आहे. भगवान बुद्धांनी या दिवशी सारनाथ येथे पहिले प्रवचन दिले असे म्हटले जाते, जे या पवित्र दिवसाचे महत्त्व दर्शवते.
गुरुपौर्णिमेचं महत्त्व
ज्या शिक्षकांनी आपले अज्ञान दूर केले त्यांच्या स्मरणार्थ गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. प्राचीन काळापासून शिष्यांच्या जीवनात गुरूचे विशेष स्थान आहे. हिंदू धर्मातील सर्व पवित्र ग्रंथ गुरूंचे महत्त्व आणि गुरू आणि त्यांचे शिष्य यांच्यातील विलक्षण बंधन प्रतिबिंबित करतात. जीवनात पहिले स्थान आईसाठी, दुसरे वडिलांसाठी, तिसरे गुरूसाठी आणि पुढे देवासाठी राखीव आहे. त्यामुळे हिंदू परंपरेत शिक्षकांना देवतांपेक्षा वरचा दर्जा दिला जातो. गुरुपौर्णिमा ही मुख्यतः जगभरातील हिंदू, जैन, शीख आणि बौद्ध समुदाय गुरु किंवा शिक्षकांच्या सन्मानार्थ साजरी करतात. भारतात गुरूंना दैनंदिन जीवनात आदराचे स्थान आहे, कारण ते त्यांच्या शिष्यांना ज्ञान आणि शिकवण देतात. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात गुरूची उपस्थिती त्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन करते, ज्यामुळे ते तत्त्वनिष्ठ जीवन जगू शकतात. बौद्ध धर्माचे अनुयायी देखील गुरुपौर्णिमेच्या दिवसाचा आदर करतात, कारण भगवान बुद्धांनी या दिवशी सारनाथ येथे पहिला उपदेश केला.
महत्वाच्या बातम्या :
- World Population Day 2021 : का साजरा केला जातो जागतिक लोकसंख्या दिन? जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्व
- Maharashtra Krushi Day : राज्यात आज साजरा केला जातोय कृषी दिन, जाणून घ्या त्याचं महत्व आणि इतिहास
- National Doctors' Day 2021 : कोरोना संक्रमणाच्या काळात आज साजरा केला जातोय 'डॉक्टर्स डे', जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्व