एक्स्प्लोर
Advertisement
Gujarat Hospital Fire | अहमदाबादमधील कोविड हॉस्पिटलमध्ये भीषण आग, आठ रुग्णांचा मृत्यू
गुजरातच्या अहमदाबाद (Gujarat Hospital Fire )येथील एका कोविड-19 हॉस्पिटलमध्ये लागलेल्या भीषण आगीत आठ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आलं आहे. या आठ रुग्णांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. ही घटना अहमदाबादच्या नवरंगपुरामधील श्रेय हॉस्पिटलमध्ये घडली.
अहमदाबाद: गुजरातच्या अहमदाबाद येथील एका कोविड-19 हॉस्पिटलमध्ये लागलेल्या भीषण आगीत आठ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आलं आहे. या आठ रुग्णांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. ही घटना अहमदाबादच्या नवरंगपुरामधील श्रेय हॉस्पिटलमध्ये घडली. स्फोट झाल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीच्या घटनेनंतर जवळपास 40 रुग्णांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. हे सर्व रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती आहे.
या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की,"अहमदाबादमधील हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेने दु:खी झालो आहे. मृतकांच्या परिवाराप्रती संवेदना. या घटनेसंदर्भात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि अहमदाबादचे महापौर बिजल पटेल यांच्याशी चर्चा केली आहे. प्रशासनाकडून घटनेतील लोकांना यथासंभव मदत केली जात आहे."
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अहमदाबादमधील नवरंगपुरा परिसरातील श्रेय हॉस्पिटलमध्ये गुरुवारी पहाटे आग लागली. दवाखान्यातील कोविड-19 पॉझिटिव्ह 40 अन्य रुग्णांना वाचवलं आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.Saddened by the tragic hospital fire in Ahmedabad. Condolences to the bereaved families. May the injured recover soon. Spoke to CM @vijayrupanibjp Ji and Mayor @ibijalpatel Ji regarding the situation. Administration is providing all possible assistance to the affected.
— Narendra Modi (@narendramodi) August 6, 2020
हॉस्पिटलला लागलेल्या आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान या हॉस्पिटलच्या आयसीयू विभागात आग लागली होती. तेथे मृत्यूमुखी पडलेले रूग्ण हे कोविड पॉझिटिव्ह होते. दरम्यान 40 रूग्णांना इतरत्र सुरक्षित हलवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.8 people have died in the fire incident. Other patients have been shifted to a safer place. A thorough investigation will be conducted: Rajendra Asari, JCP, Sector 1, Ahmedabad#Gujarat https://t.co/75rcozXCWY pic.twitter.com/3zsVmNNsTZ
— ANI (@ANI) August 6, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement