Gujarat BJP Candidate List 2022 : भाजपची पहिली यादी जाहीर! हार्दिक पटेल, रवींद्र जाडेजाच्या पत्नीला तिकीट
Gujarat BJP Candidate List 2022 : गुजरातमध्ये होणाऱ्या आगामी दोन टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी (Gujarat Assembly Elections 2022) भाजपने (BJP) पहिल्या टप्प्यासाठी 160 उमेदवारांची नावे जाहीर केली.
Gujarat BJP Candidate List 2022 : गुजरातमध्ये होणाऱ्या आगामी दोन टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी (Gujarat Assembly Elections 2022) भाजपने (BJP) पहिल्या टप्प्यासाठी 160 उमेदवारांची नावे जाहीर केली. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) अहमदाबादमधील घाटलोडिया मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले पाटीदार नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांना विरमगाम विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. दुसरीकडे भाजपने जामनगर उत्तरमधून क्रिकेटर रवींद्र जाडेजाच्या पत्नी रिवाबा यांना तिकीट दिले आहे. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी मजुरा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसने याआधीच 43 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
हार्दिक पटेल यांना विरमगाममधून तिकीट
काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले पाटीदार नेते हार्दिक पटेल यांना तिकीट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पटेल यांना विरमगाम विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.
गुजरातमध्ये भाजपकडून 38 आमदारांची तिकिटे कापली
भाजपने गुजरातमधील 69 विद्यमान आमदारांची तिकिटे परत केली, म्हणजेच त्यांना पुन्हा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे. त्याचबरोबर 38 आमदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. एकूण 160 उमेदवारांपैकी 38 नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
विजय रुपाणी निवडणूक लढवणार नाहीत
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे नाव भाजपच्या या यादीत नाही. रुपाणी यांच्या जागी डॉ.दर्शिता शाह राजकोट पश्चिममधून निवडणूक लढवणार आहेत. 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या एक वर्ष आधी, राजकोट पश्चिम मतदारसंघातील तत्कालीन आमदार विजय रुपाणी यांना हायकमांडने आनंदीबेन पटेल यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यास सांगितले होते. पाच वर्षांनंतर, 2021 च्या निवडणुकीच्या आधी, आनंदीबेन पटेल यांच्याप्रमाणे रुपाणी यांनाही पद सोडण्यास सांगण्यात आले. त्यांच्या जागी भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री करण्यात आले. दरम्यान, आताही रुपाणी यांना तिकीटही दिलेले नाही. मात्र, रुपाणी यांनी नुकताच दावा केला होता की, पक्षाने सांगितले तरच या जागेवरून निवडणूक लढवेन
गुजरात भाजपचे 'हे' नेते निवडणूक लढवणार नाहीत
माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, नितीन पटेल, भूपेंद्र सिंह चुडासामा, आरसी फल्दू, प्रदीपसिंह जडेजा, सौरभ पटेल यांनी स्वत: पत्र लिहून भाजप अध्यक्षांना निवडणूक लढवू नका आणि पक्षासाठी काम करत राहण्यास सांगितले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक
गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या आगामी दोन टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने बुधवारी पक्षाच्या मुख्यालयात बैठक घेतली. या बैठकीला पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सर्व दिग्गज नेते उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या