एक्स्प्लोर

गुजरात निवडणुकीवर आतापर्यंत 500 कोटींचा सट्टा, कोण जिंकणार?

त्याचसोबत, मांडवीतून शक्ती सिंह गुहिल, पोरबंदरहून अर्जुन मोडावाडिया जिंकण्याचा अंदाज सट्टा बाजारातून वर्तवण्यात आला आहे. तर वडगावमधून जिग्नेश मेवाणी आणि राधनपूरमधून अल्पेश ठाकोर यांचा विजय कठीण असल्याचेही म्हटले आहे.

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. ओपिनियन पोलनंतर आता सट्टा बाजारही आपले अंदाज वर्तवत आहे. एबीपी न्यूजच्या ओपिनियन पोलनंतर सट्टाबाजरानेही गुजरातमध्ये कुणाची सत्ता येईल किंवा कुणाला किती जागा मिळतील, याचे अंदाज वर्तवले आहेत. सट्टा बाजारानुसार, यावेळीही गुजरातमध्ये भाजपचीच सत्ता येईल. मात्र भाजपसाठी हा विजय सोपा नाही. काँग्रेस यावेळी भाजपला जोरदार टक्कर देईल आणि गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जास्त जागांवर विजय मिळवेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपमधील सर्वच बडे नेते गुजरात जिंकण्यासाठी दिवस-रात्र एक करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांची टीमही मोठ्या तयारीने मैदानात उतरली आहे. त्यामुळे दोन्हींकडील ताकद पणाला लागली असल्याने गुजरात विधानसभा निवडणुकीला नेहमीपेक्षा जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. सट्टाबाजारानुसार कुणाला किती जागा? भाजप - 101 ते 103 जागा काँग्रेस - 71 ते 73 जागा इतर - 5 ते 7 जागा सट्टाबाजारातील हे आकडे सेशनचे आहेत, म्हणजे जर कुणी व्यक्ती भाजपसाठी 101 जागा जिंकण्यावर 1 लाख रुपये लावत असेल आणि भाजप 101 किंवा त्याहून कमी जागा जिंकली, तर पैसे लावणाऱ्या व्यक्तीला 1 किंवा 2 लाख रुपये मिळतील. मात्र जर भाजप 102 किंवा त्याहून जास्त जागा जिंकल्यास ती व्यक्ती पराभूत झाली असे मानले जाईल. त्याचवेळी, जर कुणी व्यक्ती भाजप 103 जागा जिंकण्यावर 1 लाख रुपये लावत असेल आणि भाजप 103 किंवा त्याहून जास्त जागा जिंकल्यास पैसे लावणाऱ्या व्यक्तीला 2 लाख रुपये मिळतील. मात्र भाजप 102 हून कमी जागा जिंकल्यास पैसे लावणारी व्यक्ती पराभूत मानली जाईल. अशाच पद्धतीने काँग्रेसवरही सट्टा लावला जात आहे. भाजप आणि काँग्रेस किती जागा जिंकेल, यावरही सट्टा लावण्यात आला आहे. बुकींच्या आकडेवारीनुसार : भाजप 110 जागा जिंकल्यास भाव - 1.50 रुपये (म्हणजेच 1 रुपया लावल्यास 2.50 रुपये मिळतील.) भाजप 125 जागा जिंकण्याचा भाव - 3.50 रुपये भाजपने 'मिशन-150' पूर्ण केल्यास भाव - 7 रुपये काँग्रेस 99 जागा जिंकल्यास भाव - 3 रुपये काँग्रेस 75 जागा जिंकल्यास भाव - 1.10 रुपये पक्षांच्या जागांसोबतच व्हीआयपी जागांवरही सट्टा लावला जात आहे. ज्या जागांवरुन प्रसिद्ध उमेदवार रिंगणात आहे, तिथेही सट्टा लावण्यात आला आहे आणि हा सट्टा अत्यंत रंजक असा आहे. राजकोट - 0.40 रुपये भाव (उमेदवार - गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी) नहलाना - 0.55 रुपये भाव (उमेदवार - गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल) त्याचसोबत, मांडवीतून शक्ती सिंह गुहिल, पोरबंदरहून अर्जुन मोडावाडिया जिंकण्याचा अंदाज सट्टा बाजारातून वर्तवण्यात आला आहे. तर वडगावमधून जिग्नेश मेवाणी आणि राधनपूरमधून अल्पेश ठाकोर यांचा विजय कठीण असल्याचेही म्हटले आहे. निवडणुकीच्या काळात सट्टाबाजर प्रचंड सक्रीय होत असतो. गुजरातमध्ये आतापर्यंत 500 कोटींहून अधिक रुपयांचा सट्टा लावण्यात आला असून, मतदानाची तारीख जसजशी जवळ येते आहे, तसे हे आकडे वाढत आहेत. 9 आणि 14 डिसेंबर रोजी गुजरातमध्ये विधानसभेसाठी मतदान होणार आहे. 18 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Bangladesh Crisis : बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचा वणवा, बॉम्बस्फोट अन् जाळपोळ; पंतप्रधान तारिक रहमान यांचे भारताकडे बोट, मोठा आरोप
बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचा वणवा, बॉम्बस्फोट अन् जाळपोळ; पंतप्रधान तारिक रहमान यांचे भारताकडे बोट, मोठा आरोप
धक्कादायक! दारुमुळं अनेक कुटुंबं उद्ध्वस्त, मणिपूरमध्ये आत्तापर्यंत 15 जणांचा मृत्यू तर 181 जणावर उपचार सुरु 
धक्कादायक! दारुमुळं अनेक कुटुंबं उद्ध्वस्त, मणिपूरमध्ये आत्तापर्यंत 15 जणांचा मृत्यू तर 181 जणावर उपचार सुरु 
Rajasthan Panchayat Elections : राजस्थान जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसची लाट, 37 पैकी 27 जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता,राजधानी जयपूरमध्येही भाजपचा पराभव
काँग्रेसची राजस्थानात लाट, जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचा पराभव, मुख्यमंत्री शर्मांना धक्का 

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Embed widget