गुजरातमधील पाटीदार मतदार कुणाला मत करणार? जनतेचा कौल कुणाला?
गुजरात आणि हिमाचलप्रदेशमधील निवडणुकीचं बिगुल वाजण्यापूर्वीच दोन्ही राज्यातील राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु आहे.
Gujarat Election Opinion Poll 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. त्याआधी एबीपी न्यूजसाठी सी व्होटरने ओपिनियन पोल केला आहे. त्यानुसार, गुजरातमध्ये 1995 नंतर लागोपाठ सातव्यांदा भाजप सत्ता सत्ता स्थापन करणार असल्याचे दिसतेय. भाजप 135 ते 143 च्या दरम्यान मतदार संघात विजयी होण्याची शक्यता आहे. जी 2017 च्या तुलनेत जास्त आहेत. 2017 मध्ये भाजपला गुजरातमध्ये 99 जागांवर विजय मिळाला होता. ओपिनियन पोलनुसार भाजप आपलाच रेकॉर्ड्स मोडत पुन्हा सत्ता स्थापन करणार आहे.
सी व्होटरने हा सर्व्हे गुजरातमधील विधानसभा मतदारसंघामध्ये घेण्यात आला. सर्वेक्षणातील मार्जिन आणि एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्क्यांपर्यंत आहे. या सर्व्हेदरम्यान गुजरातमधील 182 जागांसाठी 34511 जणांनी उत्तरे दिली. ओपिनियन पोलनुसार भाजपला 47 टक्के मतं मिळतील. तर काँग्रेसला 32 टक्के आणि आम आदमी पार्टीला 17 टक्के मिळतील.
सर्व्हेनुसार
पंतप्रधान मोदींची लाट गुजरातमध्ये अद्याप कायम आहे. पण गुजरातमधील पाटीदार मतदार कुणाकडे झुकणार? यामध्ये जनतेने आश्चर्यचकीत करणारे उत्तर दिलेय. पाटीदार मतदार भाजपकडे झुकल्याचे दिसत आहे.
लेउआ पटेल मतदार कुणाच्या बाजूने?
भाजप -51%
काँग्रेस-30%
आप-15%
अन्य-4%
कडवा पटेल मतदार कुणाच्या बाजूने?
भाजप-49%
काँग्रेस-34%
आप-14%
अन्य-3%
गुजरात आणि हिमाचलप्रदेशमधील निवडणुकीचं बिगुल वाजण्यापूर्वीच दोन्ही राज्यातील राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु आहे. 2022 मधील ही शेवटची निवडणूक असून ही निवडणूक 2024 विधानसभा निवडणुकांची फायनल असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून सर्व संघ तयारीला लागले आहेत. भाजपच्या बाजूनं वातावरण निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते पक्षाध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत अनेक नेते मैदानात उतरले आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यात भाजप (BJP) सत्ता राखणार की, काँग्रेस (Congress) भाजपवर मात करत सत्ता मिळवणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
गुजरात व्यतिरिक्त हिमाचल प्रदेशातही यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. एबीपी न्यूजसाठी, सी-व्होटरनं दोन्ही राज्यांतील सर्व विधानसभा जागांसंदर्भात सर्वे करण्यात आला आहे. ओपिनियन पोलमध्ये दोन्ही राज्यातील 65 हजार 621 लोकांकडून मत जाणून घेण्यात आलं.
सर्वेक्षणातून समोर आलेले निकष पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहेत, त्यामुळे यातून एबीपी न्यूज अथवा एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.