एक्स्प्लोर

GST : मोठा निर्णय! आता फक्त 5 आणि 18 टक्के असे दोनच कर; घरे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि कपड्यांसह काय स्वस्त होणार?

GST Council Meeting Update : आधी असलेल्या 28 टक्के करांमधील बहुतांश वस्तू या 18 टक्के करांमध्ये आणण्यात आल्या आहेत. तर 12 टक्क्यामधील वस्तू या 5 टक्के करांमध्ये आणण्यात आल्या आहेत.

GST Slab Change 2025 : देशातील नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून जीएसटी स्लॅबमध्ये मोठा बदल केला आहे. देशातील 12 टक्के आणि 28 टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्याचा मोठा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यामुळे आता केवळ 5 टक्के आणि 18 टक्के असे दोनच जीएसटीचे स्लॅब असणार आहेत. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह घरंही स्वस्त होणार आहेत. येत्या 22 सप्टेंबरपासून हा निर्णय लागू होणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जीएसटी स्लॅबमध्ये बदल झाल्याची माहिती दिली. या निर्णयामुळे देशातील शेतकरी, कामगार, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना फायदा होणार असल्याचं त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे हा निर्णय शक्य झाल्याचं सांगत त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

GST Council Meeting Update : जीएसटीचे दोनच स्लॅब

दिल्लीतील सुषमा स्वराज भवन येथे बुधवारी झालेल्या जीएसटी काउन्सिलच्या (GST Council Meeting) मॅरेथॉन बैठकीत कर प्रणालीत मोठा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. तब्बल 10 तासांपेक्षा जास्त चाललेल्या या बैठकीत 12 टक्के आणि 28 टक्केचे स्लॅब पूर्णपणे रद्द करण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार आता 5 टक्के आणि 18 टक्के असे फक्त दोनच स्लॅब राहणार आहेत. केंद्र सरकारच्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे व्यापारी तसेच सामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Key Decisions in GST Council Meeting : जीएसटी बैठकीतील प्रमुख निर्णय

कर सुलभ रचना (Simplified GST Structure)

– 12% आणि 28% स्लॅब रद्द.

– 12% मधील 99% वस्तू आता 5% मध्ये.

– 28% मधील बहुतांश वस्तू 18% मध्ये.

– पान मसाला, तंबाखू यांसारख्या सिन गुड्स (Sin Goods) आणि लक्झरी गाड्यांवर 40% चा नवीन स्लॅब प्रस्तावित.

रिफंड प्रक्रिया (GST Refund):

– ऑटोमॅटिक रिफंड सिस्टीम लागू होणार.

निर्यातकांसाठी सवलत (Exporters Relief):

– रजिस्ट्रेशन कालावधी 1 महिना वरून फक्त 3 दिवसांवर आणला. त्याचा फायदा निर्यातकांना होणार आहे.

कपडे व पादत्राणे (Clothes & Footwear):

– 2,500 रुपयांपर्यंतच्या वस्तूंवर जीएसटी आता फक्त 5 टक्के कर लावण्यात येणार असल्याने कपडे आणि पादत्राणे अशा वस्तू स्वस्त होणार आहेत.

दैनंदिन वस्तूंवर सवलत (Daily Use Items GST):

– पनीर, खाखरा, चपाती, साबण, टूथपेस्ट, शॅम्पू यांसारख्या वस्तूंवरील कर 18% वरून 5% किंवा 0% करण्याबाबत चर्चा.

आरोग्य विमा व जीवन विमा (Health & Life Insurance):

– 5 लाख रुपयांपर्यंतच्या हेल्थ पॉलिसी व टर्म इन्शुरन्सवर पूर्ण सूट मिळण्याची शक्यता.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन या निर्णयांची घोषणा केली. तज्ज्ञांच्या मते, जीएसटीमधील या मोठ्या बदलांमुळे कररचना अधिक सोपी होईल आणि सामान्य नागरिकांवरचा आर्थिक भार कमी होईल.

 

महत्त्वाच्या बातम्या

अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
धक्कादायक! चौरी चौरा एक्सप्रेस रुळावरुन घसरली,  रेल्वे अपघातामुळं प्रवाशांमध्ये घबराट, अधिकारी घटनास्थळी दाखल
धक्कादायक! चौरी चौरा एक्सप्रेस रुळावरुन घसरली,  रेल्वे अपघातामुळं प्रवाशांमध्ये घबराट, अधिकारी घटनास्थळी दाखल
Keshav Upadhye on Sonia Gandhi: बाबरीवर दुःखाचे अश्रू, पण बोफोर्सवर मौन का? सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर केशव उपाध्येंचे रोखठोक सवाल, म्हणाले, 'आत्मचरित्रातून स्वतःची प्रतिमा कितीही उजळवली...'
बाबरीवर दुःखाचे अश्रू, पण बोफोर्सवर मौन का? सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर केशव उपाध्येंचे रोखठोक सवाल, म्हणाले, 'आत्मचरित्रातून स्वतःची प्रतिमा कितीही उजळवली...'
एकदाच मोबाईल चार्ज करा, निवांत राहा, 'ही' कंपनी करणार जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च, नेमका किती असणार बॅटरी बॅकअप
एकदाच मोबाईल चार्ज करा, निवांत राहा, 'ही' कंपनी करणार जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च, नेमका किती असणार बॅटरी बॅकअप

व्हिडीओ

Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
मोठी बातमी, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
बहीण अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलं का? मनोज जरांगे पाटील म्हणाले तिघींनाही भाऊबीज पाठवणार
बहीण अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलं का? मनोज जरांगे पाटील म्हणाले तिघींनाही भाऊबीज पाठवणार
Nvidia CEO Jensen Huang and Alice Huang: अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार
पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार
Embed widget