Nirmala Sitharaman : जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर काय स्वस्त काय महाग? जाणून घ्या
नवी दिल्ली येथे जीएसटी परिषदेची 49 वी बैठक पार पडली. या बैठकीत निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले.
Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (18 फेब्रुवारी) नवी दिल्ली येथे जीएसटी परिषदेची 49 वी बैठक पार पडली. अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी आणि विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री देखील या बैठकीला उपस्थित होते. यावेळी अनेक महत्वाचे निर्णय निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी घेतले. या बैठकीनंतर काय स्वस्त झाले आणि काय महाग झाले? ते जाणून घेऊयात...
जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर काय स्वस्त?
- काकवी
- पेन्सिल शार्पनर (शार्पनरवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 12 टक्के करण्यात आला आहे.)
- ट्रॅकिंग डिव्हाइज
- एनटीएद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षेची फी
काय महाग?
कोर्ट सर्व्हिस
पान मसाला
गुटखा
तंबाखू
Entire balance of GST compensation which is to a total of Rs 16,982 crores for June will be cleared. Although this amount is not available in compensation fund as of today, we've decided to release this amount from Centre’s resources.
— NSitharamanOffice (@nsitharamanoffc) February 18, 2023
- Smt @nsitharaman. (1/2) pic.twitter.com/HAzGkS84VL
राज्यांना जीएसटी मिळणार
जून 2022साठी जीएसटी भरपाईची रु. 16,982 कोटी रुपयांची संपूर्ण थकबाकी राज्यांना चुकती करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. जीएसटी भरपाई निधीमध्ये कोणतीही रक्कम नसल्यामुळे केंद्राने ही रक्कम आपल्या स्वतःच्या संसाधनांमधून खुली करण्याचा आणि ती भविष्यातील भरपाई अधिभार संकलनातून वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार ज्या राज्यांनी राज्यांच्या महालेखापरीक्षकांनी प्रमाणित केलेली महसुलाची आकडेवारी उपलब्ध केली आहे त्या राज्यांना ग्राह्य असलेली जीएसटीची अंतिम भरपाई म्हणून देखील 16,524 कोटी रुपयांची थकबाकी चुकती करणार आहे.
मनीष सिसोदिया यांनी या बैठकीत पापड आणि कचरीच्या कर आकारणीतील तफावत दूर करण्याची मागणी केली. याबाबत त्यांनी एक ट्वीट शेअर केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, 'जीएसटी कौन्सिलच्या आज झालेल्या बैठकीत पापड आणि कचरीच्या कर आकारणीतील तफावत दूर करण्याची मागणी करण्यात आली. पापडवर 0% GST आहे पण कचरीला 18% कराच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. नमकीन, पास्ता, पिझ्झा ब्रेड, शेवया इत्यादींवर 5% ते 12% कर आहे. मग कचरीवर 18% कर ठेवणे चुकीचे आहे. '
जीएसटी काउंसिल की बैठक में आज पापड़ और कचरी के टैक्स निर्धारण में आई विसंगति को दूर करने की माँग रखी.
— Manish Sisodia (@msisodia) February 18, 2023
पापड़ पर 0% GST है लेकिन कचरी को 18% टैक्स की श्रेणी में रख दिया गया है.
नमकीन, पास्ता, पिज़्ज़ा ब्रेड, सिंवई आदि पर 5% से 12% टैक्स है तो फिर कचरी पर 18% रखना ग़लत था. pic.twitter.com/nozxezqTb9
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: