एक्स्प्लोर
Advertisement
तरुणीची छेडछाड, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
काशीपूर : उत्तराखंडमधील काशीपूरमध्ये काही जणांनी मिळून तरुणीची छेडछाड करुन, तिला निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला. शिवाय, या घटनेचं व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर व्हायरल केला. धक्कादायक म्हणजे या साऱ्या घटनेदरम्यान आजूबाजूच्या लोकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.
वरीष्ठ पोलीस अधीक्षक अबुदाई कृष्णराज यांच्या माहितीनुसार, उधमसिंग नगर जिल्ह्यात काशीपूरच्या मांझरा परिसरात तरुणी आपल्या भावाला शोधण्यासाठी आली. यावेळी ही धक्कादायक घटना घडली. तरुणी एकटी दिसल्याने आरोपींनी तिला पकडून तिचे कपडे फाडले आणि तरुणीला मारहाणही करत छेडछाड केली.
छेडछाड करणाऱ्यांनी या घटनेचं रेकॉर्डिंग करत व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला. व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिल्यानंतर स्थानिकांचा संताप अनावर झाला आणि काशीपूर पोलिस ठाण्याला घेराव घातला.
तरुणीने घरी जाऊन आई-वडिलांना घडलेला सारा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. या प्रकरणी सात आरोपींविरोधात तक्रार दाखल करुन त्यांना अटक करण्यात आले आहे. त्यांच्याकडून व्हिडीओ क्लिपही जप्त करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement