Captain Varun Singh Death : हेलिकॉप्टर दुर्घटनेत गंभीर जखमी झालेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांची मृत्यूशी झुंज अपयशी
Captain Varun Singh Death : दुर्घटनेत बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचं निधन झालं आहे. 8 डिसेंबरला कुन्नूरमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता.
ग्रुप कॅप्टन वरुण सिंह कोण?
भारतीय हवाईदलातील विंग कमांडर वरुण सिंह यांना याआधी शौर्य चक्र देऊनही सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांनी भारतीय हवाईदलासाठी केलेल्या सेवेसाठी त्यांचा हा सन्मान करण्यात आला आहे. तसंच याआधी तेजस विमानाच्या फ्लाईट सिस्टम फेलियर झाली असताना यशस्वीरित्या विमानचं लँडिग करत दुर्घटना होण्यापासून रोखलं होतं.
Group Captain Varun Singh served the nation with pride, valour and utmost professionalism. I am extremely anguished by his passing away. His rich service to the nation will never be forgotten. Condolences to his family and friends. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) December 15, 2021
हेलिकॉप्टर दुर्घटनेत बिपीन रावत यांचा मृत्यू
लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांना घेऊन हवाई दलाचं IAF Mi-17V5 हेलिकॉप्टर कर्नाटक-तामिळनाडू सीमेवरील कुन्नूरकडे जात होतं. यामध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी, त्यांचा स्टाफसह भारतीय सैन्यदलातील बडे अधिकारी होते. जवळपास 14 जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. मात्र दुपारी साडेबाराच्या सुमारास खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. या दुर्घटनेत देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर 14 जण होते. त्यापैकी केवळ एक ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे बचावले होते. ते गंभीर जखमी होते. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, बिपीन रावत हे आपल्या पत्नीसह वेलिंगटन इथे एका कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत लष्कराचे वरिष्ठ अधिकारीही सोबत होते. वेलिंगटनमध्ये आर्मीचं कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये सीडीएस बिपीन रावत यांचं लेक्चर नियोजित होतं. वेलिंगटनवरुन कुन्नूरला जाताना हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :- Bipin Rawat Helicopter Crash : बिपीन रावत यांनी केले होते सर्जिकल स्ट्राईक आणि म्यानमार ऑपरेशनचे नेतृत्व
- Madhulika Rawat : आयुष्यभर खंबीर पाठिंबा, शेवटच्या क्षणापर्यंत साथ, हेलिकॉप्टर दुर्घटनेत मधुलिका रावत यांचंही निधन!