एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
माध्यमांच्या कामात सरकारचा हस्तक्षेप नसावा : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : माध्यमांच्या कामात सरकारचा हस्तक्षेप नसावा. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहिल याची सर्वांनी काळजी घ्यावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.
राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते.
आणीबाणीच्या काळात माध्यमांचा आवाज दाबण्यात आला. माध्यमांच्या कामात सरकारचा हस्तक्षेप नसावा. शिवाय माध्यमांच्या चुकीवरुन त्यांचं मूल्यांकन करु नये, असं आवाहन मोदींनी केलं.
माध्यमांनी वेळेनुसार बदल स्वीकारणं देखील आवश्यक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य गरजेचं आहे आणि त्याला ठराविक मर्यादा देखील असावी, असं मोदी म्हणाले.
दरम्यान मोदींनी आपल्या भाषणात पत्रकार सुरक्षेच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. पत्रकारांवर होणारे हल्ले गंभीर असून हा दुःखद आणि चिंतेचा विषय आहे. पत्रकारांची सुरक्षा ही सरकारची प्राथमिकता हवी, असं मोदींनी सांगितलं.
यासोबतच मोदींनी स्वच्छता अभियानातील माध्यमांच्या योगदानाचं कौतुकही केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement