एक्स्प्लोर
Pulwama terror attack : पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तांना चर्चेसाठी बोलावलं तर पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना पाचारण करुन खडसावले
पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना केंद्र सरकारने चर्चेसाठी बोलावलं आहे. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होणार आहे. केंद्र सरकार भारतीय उच्चायुक्तांशी सल्लामसलत करणार आहेत.
नवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून निषेध होत आहे. दरम्यान, पाकिस्तानला आणि दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. भारताने पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना चर्चेसाठी बोलावलं आहे. त्याआधी पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना भारतानं समन्स बजावला आहे. पाकिस्तानच्या मुसक्या चारही बाजूंनी आवळायला भारतानं सुरुवात केली आहे.
पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना केंद्र सरकारने चर्चेसाठी बोलावलं आहे. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होणार आहे. केंद्र सरकार भारतीय उच्चायुक्तांशी सल्लामसलत करणार आहेत. हा हल्ला झाल्याचे समजताच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हेदेखील त्यांचा भूतान दौरा अर्धवट सोडून भारतात परतले. या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करता पाकिस्तानातील उच्चायुक्तांना भारतात बोलावणे हीदेखील महत्त्वाची बाब मानली जाते आहे.
पाकिस्तानविरुद्ध पहिली कारवाई, 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढून घेतला
पुलवामा हल्ल्यानंतर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर पाकिस्तानविरुद्ध पहिलं मोठं पाऊल उचललं आहे. व्यापार उद्योगात पाकिस्तानला दिलेला 'मोस्ट फेवड नेशन'चा दर्जा काढण्याचा निर्णय कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीच्या (सीसीएस) बैठकीत घेण्यात आला. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिली.
पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी आज सीसीएसची बैठक पार पडली. सुमारे 55 मिनिटांच्या बैठकीला गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल, तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख उपस्थित होते. सीसीएसच्या बैठकीत दोन मिनिटं मौन राखून शहीदांना आदरांजली वाहण्यात आली.
भारताने पाकिस्तानला 1999 मध्ये 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा दिला होता. बैठकीनंतर अरुण जेटली यांनी पत्रकारांना सांगितलं की, "या हल्ल्यात सहभागी असलेल्यांना आणि त्याला पाठिंबा देणाऱ्यांविरोधात सुरक्षा यंत्रणा सर्वतोपरी कारवाई करेल."
पाकिस्तानला एकटं पाडणार
"आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय हरतऱ्हेची कुटनीती वापरुन प्रयत्न करत आहे. उपलब्ध पुरावे सादर केले जातील. पाकिस्तानला दिलेला 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढून घेतला आहे. वाणिज्य मंत्रालय याबाबत लवकरच परिपत्रक जारी करेल," असं जेटली यांनी सांगितलं.
"33 वर्षांपूर्वी भारताने संयुक्त राष्ट्रात आंतरराष्ट्रीय दहशतवादावर प्रस्ताव ठेवला होता. पण तो मंजूर झाला नाही, कारण दहशतवादाच्या व्याख्येवर सगळ्यांची सहमती मिळाली नव्हती. दहशतवादाची व्याख्या संयुक्त राष्ट्रांमध्ये लवकरात लवकर स्वीकारली जावी, याचा परराष्ट्र मंत्रालयाचा प्रयत्न असेल," असं अरुण जेटली म्हणाले.
काय झालं पुलवामात?
जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) संध्याकाळी झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले आहेत. शहीद जवानांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उरीमध्ये सप्टेंबर 2016 मधील दहशतवादी हल्ल्यानंतरचा काश्मीरमध्ये सुरक्षा दलावर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर अवंतीपोरा परिसरात सीआरपीएफच्या एका ताफ्याला लक्ष्य केलं. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
संबधित बातम्या
पाकिस्तानविरुद्ध पहिली कारवाई, 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढून घेतला
पाकिस्तानचा 'एमएफएन' दर्जा रद्द, 'मोस्ट फेवर्ड नेशन' म्हणजे काय?
Pulwama terror attack : हल्ल्याला फक्त पाकिस्तान जबाबदार नाही, फारुख अब्दुल्लांचं वादग्रस्त वक्तव्य
Pulwama terror attack : आदिल अहमद दार, आजच्या हल्ल्याचा क्रूरकर्मा! Pulwama terror attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांची नावं Pulwama terror attack : बॉलिवूडकरांनीही व्यक्त केला संताप भ्याड हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ, राज ठाकरेंचे मोदींना आवाहन जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : नरेंद्र मोदी शहीद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार : माजी लष्करप्रमुखांचा इशारा पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 40 जवान शहीदअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement