एक्स्प्लोर
केंद्र सरकारकडून 149 नव्या पोस्ट ऑफिस, पासपोर्ट केंद्रांची घोषणा
नवी दिल्ली : आता पासपोर्ट बनवण्यासाठीचा त्रास कमी होणार आहे. कारण, केंद्र सरकारने 50 किलोमीटर अंतरापर्यंत पासपोर्ट केंद्र सुरु करण्याची योजना सुरु करण्याच्या तयारीत आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी 149 पोस्ट ऑफिस आणि पासपोर्ट कार्यालयांची घोषणा केली आहे.
यातील परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं पहिल्या टप्प्यात 86 पीओपीएसके सुरु करण्यात येणार आहेत. हे परराष्ट्र खातं आणि पोस्ट ऑफिसच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात येणार आहेत. सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र खात्याची सूत्रं हाती घेतल्यापासून 16 नवीन पासपोर्ट कार्यालये सुरु केली आहेत. यात ईशान्य भारतातील राज्यांना प्राथमिकता देण्यात आली होती.
याआधी देशात एकूण 77 पासपोर्ट कार्यालय आहेत. त्यातच आता नव्या 149 पासपोर्ट कार्यालयाची घोषणा करण्यात आली आहे.
सुषमा स्वराज यांनी याबाबत सांगितलं की, केंद्र सरकारने एक उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवलं असून, कोणालाही पासपोर्ट बनवण्यासाठी 50 किलोमीटरपेक्षा जास्त दूर जावं लागू नये. तिसऱ्या टप्प्यात आणखी पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यात येतील, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement