एक्स्प्लोर

एक गोणी खताऐवजी केवळ अर्धा लिटर लिक्विडने शेतकऱ्यांचं काम होणार, IFFCO कडून नॅनो युरियाची निर्मिती

इफ्कोने बनवलेल्या नॅनो युरिया लिक्विडची 500 मिलीची एक बाटली सामान्य युरियाच्या एका गोणीच्या बरोबरीची आहे. इफकोने शेतकऱ्यांसाठी 500 मिली नॅनो युरियाच्या एका बाटलीची किंमत 240 रुपये निर्धारित केली आहे, जी सामान्य युरिया खताच्या गोणीच्या किमतीपेक्षा 10 टक्क्यांनी कमी आहे.

नवी दिल्ली : इंडियन फार्मर्स फर्टिलायजर कोऑपरेटिव्ह लिमिटेडने (IFFCO) जगात पहिल्यांदाच नॅनो युरिया लिक्विड तयार केलं आहे. यामुळे पिकांचं उत्पादन वाढून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल. आता एक गोणी युरिया खताच्या ऐवजी अर्धा लिटर नॅनो युरिया लिक्विड पुरेसं ठरणार आहे.

इफ्कोची ऑनलाईन-ऑफलाईन झालेल्या 50व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत ही घोषणा करण्यात आली. जमिनीत युरियाचा वापर कमी करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाने प्रेरित होत हे लिक्विड तयार करण्यात आलं आहे.

नॅनो युरियाचा अर्थ काय? 
कमी प्रमाण/आकार आणि मोठी क्षमता या दृष्टीने हे नॅनो युरिया लिक्विड तयार करण्यात आलं आहे. इफ्कोने बनवलेल्या नॅनो युरिया लिक्विडची 500 मिलीची एक बाटली सामान्य युरियाच्या एका गोणीच्या बरोबरीची आहे. याच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल. नॅनो युरिया लिक्विडचा आकार लहान असल्याने ते खिशातही मावू शकतं, जेणेकरुन ने-आण करणं सोपं होईल.

पिकांचं उत्पादन वाढतं 
इफ्कोचा दावा आहे की, नॅनो युरिया लिक्विड रोपांच्या पोषणासाठी प्रभावी आणि परिणामकारक आहे. याच्या वापरामुळे पिकांचं उत्पादन वाढतं तसंच पोषक तत्वांच्या गुणवत्तेत सुधारणा होते. नॅनो युरिया लिक्विडमुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीची गुणवत्ता सुधारणा तसंच जलवायू परिवर्तन आणि टिकाऊ उत्पादनावर सकारात्मक परिणाम करुन ग्लोबल वार्मिंग कमी करण्यात महत्त्वाची भूमिका निभावतं.

कसं वाढणार शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार? 
इफ्कोचा दावा आहे की नॅनो युरिया लिक्विड शेतकऱ्यांसाठी स्वस्त आहे आणि उत्पादन क्षमता वाढते. अशाप्रकारे शेतकऱ्यांचा खर्चही कमी होणार आहे, तर उत्पादन वाढल्याने कमाई जास्त होणार आहे.

किती उत्पादन वाढेल? 
इफ्कोनुसार, यासाठी संपूर्ण देशातील 94 पेक्षा जास्त पिकांवर सुमारे 11 हजार  कृषी क्षेत्र परीक्षण (एफएफटी) करण्यात आले होते. यामुळे पिकांच्या उत्पादनात सरासरी 8 टक्क्यांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. इफकोच्या वैज्ञानिक आणि अभियंत्यांनी नॅनो युरिया लिक्विड हे कलोलमधील नॅनो बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये तयार केलं आहे. 

इफ्को नॅनो युरिया लिक्विड हे सामान्य युरिया खताचा वापर 50 टक्क्याने कमी करण्याच्या उद्देशाने कमी करण्यात आला आहे. याच्या 500 मिलीच्या एका बाटलीत 40,000 पीपीएम नायट्रोजन असतो, ज्यामधून सामान्य युरिया खताच्या गोणीएवढं नायट्रोजन पोषक तत्व मिळतं.

गोणीमधल्या युरियापेक्षा लिक्विड युरियाची किंमत कमी 
इफ्को नॅनो युरियाचं उत्पादनाला जून महिन्यातच सुरुवात होणार असून लवकरच याची विक्रीही केली जाईल. इफकोने शेतकऱ्यांसाठी 500 मिली नॅनो युरियाच्या एका बाटलीची किंमत 240 रुपये निर्धारित केली आहे, जी सामान्य युरिया खताच्या गोणीच्या किमतीपेक्षा 10 टक्क्यांनी कमी आहे.

भारतात दरवर्षी सुमारे 350 लाख टन युरियाचा वापर केला जातो. नॅनो युरियामुळे खताचा वापर निम्म्याने कमी होईल. अनुदानावर वार्षिक 600 कोटी रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. यामुळे भारताची युरिया आयात करण्याची गरजही कमी होईल.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Meeting with Shiv Sena MPs: पीएम मोदींची शिवसेनेच्या सात खासदारांसोबत 'ब्रेकफास्ट पे चर्चा', ओमराजे निंबाळकरांच्या 'त्या' गोष्टीची खास विचारपूस; बैठकीतील Inside Story
पीएम मोदींची शिवसेनेच्या सात खासदारांसोबत 'ब्रेकफास्ट पे चर्चा', ओमराजे निंबाळकरांच्या 'त्या' गोष्टीची खास विचारपूस; बैठकीतील Inside Story
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Hyderabad Crime News: हॉटेलच्या खोलीत CA चा दुर्दैवी अंत, यूट्यूबवर हेलियम गॅस हुंगण्याचे व्हिडीओ पाहिले अन्...; चिठ्ठीतून चक्रावणारं कारण समोर
हॉटेलच्या खोलीत CA चा दुर्दैवी अंत, यूट्यूबवर हेलियम गॅस हुंगण्याचे व्हिडीओ पाहिले अन्...; चिठ्ठीतून चक्रावणारं कारण समोर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Embed widget