Gold Rates Today: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काय आहेत सोन्याचे दर?
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अनेक शुभकार्य पार पडतात, नव्या वस्तूंची खरेदीही करण्यात येते

Gold Rates Today: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अनेक शुभकार्य पार पडतात, नव्या वस्तूंची खरेदीही करण्यात येते. त्यासोबतच प्राधान्य असतं ते म्हणजे सोनं खरेदीला. अतिशय शुभ पर्व मानल्या जाणाऱ्या या दिवशी यंदाच्या वर्षी सोनं खरेदीचा उत्साह काहीसा कमी दिसत आहे. त्यातच सोन्याचे दर काय असणार आहेत, याकडेच साऱ्यांचं लक्ष असल्याचं दिसत आहे.
आजच्या दिवशी सोन्याचे दर प्रती 10 ग्रॅम 22 कॅरेटसाठी 45 हजारांच्या जवळपास असल्याचं पाहायला मिळत आहे. तर, 24 कॅरेट सोन्यासाठी प्रती 10 ग्रॅमवर 45720 रुपये मोजावे लागत आहेत. यंदाच्या वर्षी मागील वर्षीप्रमाणेत सोनं खरेदीवर कोरोना, लॉकडाऊनचं सावट दिसत आहे.
आयएएनएस या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार अक्षय्य तृतीयेला सोन्याची खरेदी अतिशय शुभ आणि लाभदायी समजली जाते. परंतु कोरोनाच्या संकटामुळं लागू करण्यात आलेले लॉकडाऊनचे नियम आणि निर्बंध पाहता याचा थेट परिणाम सराफा बाजारावर होणार आहे. नागरिक प्रत्यक्षात सोनं खरेदीसाठी कमीच प्राधान्य देताना दिसत आहेत.
सराफा बाजारात जाऊन, किंवा पेढीवर प्रत्यक्षात जाऊन सोनं खरेदीचा पर्याय यंदाही उपलब्ध नसला तरीही, पेपर गोल्ड आणि डिजिटल गोल्ड असे पर्याय ग्राहकांसाठी उबलब्ध आहेत. त्यामुळं अनेख्या मार्गानं सोनं खरेदीचा पर्याय सर्वांना उपलब्ध होणार आहे.
22 आणि 24 कॅरेट सोन्यासाठी प्रती 10 ग्रॅममागे आजचे दर...
चेन्नई- 45,000 (22 कॅरेट), 49090 (24 कॅरेट)
मुंबई - 44720 (22 कॅरेट), 45720 (24 कॅरेट)
दिल्ली- 45900 (22 कॅरेट), 49900 (24 कॅरेट)
कोलकाता - 45800 (22 कॅरेट), 49560 (24 कॅरेट)
बंगळुरू- 44500 (22 कॅरेट), 48560 (24 कॅरेट)
हैदराबाद- 44500 (22 कॅरेट), 48560 (24 कॅरेट)
Before You Go
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले





















