एक्स्प्लोर

गोव्यात भाजपला मोठा धक्का, पर्रिकरांच्या निधनाने रिक्त झालेल्या पणजी पोटनिवडणुकीत काँग्रेस विजयी

भाजपचा गड मानला जाणारी पणजी विधानसभा काँग्रेसने काबीज केली आहे. गेल्या पंचवीस वर्षापासूनची भाजपची ही जागा काँग्रेसने मिळवली आहे. गोव्याच्या राजधानीवर काँग्रेसने झेंडा फडकावला आहे.

गोवा : गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पणजी पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला आहे. काँग्रेसचे बाबूश मोन्सरात यांनी पणजी मतदारसंघात विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांचा पराभव करत भाजपला धक्का दिला आहे. काँग्रेसचे बाबुश मोन्सरात यांनी भाजपच्या सिद्धार्थ कुंकळ्येकर यांचा 1758 मतांनी पराभव करत भाजपला धक्का दिला आहे. मात्र इतर तीन जागांवर मात्र भाजपने विजय मिळवला आहे. या ठिकाणी भाजपचे सिद्धार्थ कुंकळ्येकर, काँग्रेसचे बाबुश मोन्सरात आणि गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार सुभाष वेलिंगकर यांच्यात तिहेरी लढत होती. भाजपचा गड मानला जाणारी पणजी विधानसभा काँग्रेसने काबीज केली आहे. गेल्या पंचवीस वर्षापासूनची भाजपची ही जागा काँग्रेसने मिळवली आहे. गोव्याच्या राजधानीवर काँग्रेसने झेंडा फडकावला आहे. पणजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे ज्येष्ठ पुत्र उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारत भाजपने माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना उमेदवारी दिली होती. तब्बल 25 वर्षे पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या मतदारसंघातील उमेदवारीसाठी उत्पल पर्रिकर आणि माजी आमदार कुंकळ्येकर यांची नावे गोवा प्रदेशतर्फे केंद्रीय समितीकडे पाठवण्यात आली होती. केंद्रीय समितीने उत्पल यांना डावलून कुंकळ्येकर यांना उमेदवारी दिली होती. मात्र हा गड राखण्यात कुंकळ्येकर यांना अपयश आले आहे. मांद्रे, शिरोडा व म्हापसा या तीन मतदारसंघांमध्ये भाजपाने निर्णायक आघाडी घेतली आहे.  मांद्रे, शिरोडा, म्हापसा व पणजी या चार विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका झाल्या होत्या. पणजीत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे तर म्हापशात माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक झाली.
या पोटनिवडणुकीत भाजपाविरुद्ध काँग्रेस, अशी जोरदार टक्कर झाली. म्हापसा आणि पणजी हे भाजपचे बालेकिल्लेच बनले होते. त्यापैकी पणजीच्या बालेकिल्ल्याला काँग्रेसने सुरूंग लावला. बाबुश मोन्सेरात यांना काँग्रेसने तिकीट दिल्याने पणजीत भाजपला पराभव सहन करावा लागला. पर्रीकर यांना जर वगळले तर भाजपा म्हणजे काहीच नव्हे, अशी प्रतिक्रिया मोन्सेरात यांनी जिंकल्यानंतर व्यक्त केली.
शिरोडा मतदारसंघात भाजपविरुद्ध महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष अशी जोरदार लढत झाली. शिरोडयात काँग्रेस पक्षाचे उमेदवार महादेव नाईक हे तिस-या स्थानावर आहेत. भाजपच्या सुभाष शिरोडकर यांना फक्त 66 मतांची आघाडी मिळाली आहे. मगो पक्षासाठी हा फार मोठा धक्का ठरला आहे. कारण मगोपने भाजपविरुद्ध शिरोडा मतदारसंघात उमेदवार उभा करू नये अशी विनंती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही मगोपला केली होती.
मगोपने शिरोड्यात उमेदवार उभा केल्यानेच सुदिन ढवळीकर यांना भाजपने मंत्रिमंडळातून डच्चू दिला होता. ढवळीकर त्यावेळी भाजपप्रणीत आघाडीमध्ये उपमुख्यमंत्री होते. मगोपने उपमुख्यमंत्रीपदही गमावले. तसेच मगोपचे दोन आमदारही फुटून भाजपमध्ये गेले. सुदिन ढवळीकर आता एकाकी पडले आहेत. त्यांचे बंधू तथा मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांचा हा सलग दुसरा पराभव आहे.
म्हापशात फ्रान्सिस डिसोझा यांचे पुत्र जोशुआ डिसोझा यांनी काँग्रेसला टक्कर देण्यात यश मिळविले. मांद्रे मतदारसंघात भाजपचे उमेदवार दयानंद सोपटे यांना अपक्ष उमेदवार जित आरोलकर यांनी टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र सोपटे यांना यशस्वी होण्यापासून कोणच रोखू शकणार नाहीत,अशी सध्याची परिस्थितीती आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
Embed widget