एक्स्प्लोर

गोव्यात पर्रिकरांच्या गैरहजेरीत तात्पुरत्या नेतृत्वासाठी चाचपणी

प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबई येथे गेलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना पुढील उपचारांसाठी अमेरिकेत नेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या बिघडलेल्या प्रकृतीची दखल भाजपच्या हायकमांडने घेतली आहे. पर्रिकर आज रात्री अपचनाच्या त्रासामुळे अमेरिकेला रवाना होणार आहेत. प्राथमिक अंदाजानुसार आठ दिवस त्यांचा मुक्काम अमेरिकेत असणार आहे. दरम्यानच्या काळात सरकारी कारभारावर परिणाम होऊ नये यासाठी पर्यायी नेतृत्व तयार करण्याबाबत भाजपमध्ये विचार विनिमय सुरु आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबई येथे गेलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना पुढील उपचारांसाठी अमेरिकेत नेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. रात्री एक वाजता ते अमेरिकेला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापार्श्वभूमीवर गोव्यात तात्पुरत्या नेतृत्वाबाबत चर्चा सुरु झाली आहे. भाजपची कोअर कमिटी उद्या नवी दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेणार आहे. आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. गोव्यात नेतृत्व समस्या उद्भवल्याने पक्षाला टीकेचा सामना करावा लागत असल्याच्या वृत्ताबाबत बोलताना नाईक म्हणाले, "या विषयी केंद्रातील नेत्यांशी चर्चा केली जाणार आहे. राज्याचे तात्पुरते नेतृत्व अन्य नेत्याकडे देण्याबाबत यावेळी चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाईक आजच दिल्लीला रवाना होणार आहेत. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, दक्षिण गोवा खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, सदानंद तानावडे, दत्ता खोलकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आदी नेते मुंबईत दाखल झाले असून मुख्यमंत्री पर्रिकर यांची भेट घेऊन ही मंडळी पुढे नवी दिल्लीस रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे

Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 

भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा

बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक

Embed widget