एक्स्प्लोर
मनोहर पर्रिकरांना डिस्चार्ज, गोव्यात अर्थसंकल्पही सादर
डिस्चार्ज मिळाल्यावर गुरुवारी सकाळी विशेष विमानाने मनोहर पर्रिकर गोव्यात दाखल झाले.
पणजी : मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर गोव्यात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी विधानसभेत अर्थसंकल्पही सादर केला.
गेल्या आठ दिवसांपासून पर्रिकर यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. मनोहर पर्रिकर यांना स्वादुपिंडाचा विकार जडला आहे. डिस्चार्ज मिळाल्यावर गुरुवारी सकाळी विशेष विमानाने ते गोव्यात दाखल झाले.
गोव्याचे अर्थमंत्री या नात्यानं त्यांनी अर्थसंकल्प तयार केला होता. मात्र गेल्या बुधवारी अचानक प्रकृती बिघडल्यामुळे ते पहिले तीन दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नाहीत.
प्रकृती खालावल्याने त्यांना लीलावतीमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी पर्रिकरांची भेटही घेतली होती.
पर्रिकरांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी गोव्यातली मंदिरं, चर्चमध्ये प्रार्थना सुरु होत्या. पर्रिकर मायभूमीत परत आल्यामुळे गोवेकरांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
Advertisement