एक्स्प्लोर

गोमॅकोच्या शवागरातून मृतदेह गायब

जानुझच्या कुटुंबियांची आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी माफी मागीतली असून या घटनेस जबाबदार धरून डॉ. एडमंड, डॉ. मच्छिंद्र जल्मी व प्रकाश नार्वेकर यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागरातून एका युवकाचा मृतदेह गायब होण्याची घटना समोर आली आहे. संबंधिताच्या कुटुंबाने चौकशी केल्यानंतर काल सायंकाळी अज्ञात मृतदेहांची विल्हेवाट लावताना या युवकाच्या शवाचीही विल्हेवाट लावण्यात आली अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित युवकाच्या कुटुंबाने आगशी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. जानुझच्या कुटुंबियांची आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी माफी मागीतली असून या घटनेस जबाबदार धरून डॉ. एडमंड, डॉ. मच्छिंद्र जल्मी व प्रकाश नार्वेकर यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तिघांविरुद्ध पोलिस तक्रार दाखल करण्यात आली असल्याची  माहिती देण्यात आली आहे. हळदोणा येथील जानुझ गोन्साल्वीस या 24 वर्षीय तरुणाच्या मृतदेहाची शवचिकित्सा 24 सप्टेंबर रोजी झाली होती. त्यानंतर शवागरात त्याचा मृतदेह ठेवण्यात आला. आज त्याच्या कुटंबाने मृतदेह ताब्यात घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली तेव्हा शवागरात मृतदेहच नसल्याचे आढळून आले. काल संध्याकाळी शवागरातील सुमारे दहा अज्ञात मृतदेहांची विल्हेवाट लावण्यात आली त्यात जानुझच्या मतृदेहाचाही समावेश करण्यात आला अशी माहिती शवागराच्या कर्मचाऱ्यांनी दिली. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ.प्रदीप नाईक यांच्या मार्फत चौकशी सुरू झाली आहे. योग्य ती कारवाई होईल असे महाविद्यालयाचे अधिक्षत डॉ.शिवानंद बांदेकर यांनी सांगितले. विभागाचे प्रमुख डॉ.एडमंड रॉड्रीगीश यांना हल्लीच सरकारने निवृत्तीनंतर सेवावाढ दिली होती. सेवावाढीच्या काळात त्यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. दुपारपर्यंत युनूसच्या कुटुंबाने तक्रार नोंदवली नव्हती. आगशी पोलीस स्थानकाचे निरीक्षक उदय गावडे यांना विचारले असता कुटुंबाने आपण तक्रार करण्यासाठी येत असल्याचे कळवले आहे पण अजून तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यानंतरच पुढील तपास होईल असे स्पष्ट केले. गोमेकॉ शवागृह मृतदेह गायब प्रकरणास आरोग्यमंत्री विश्वजीत राणे जबाबदार असून त्यांच्या विरोधात काँग्रेस एफआयआर दाखल करणार असल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते उरफान मुल्ला यांनी दिली आहे. राणे यांनी राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्री पर्रिकर यांनी त्यांना हटवावे,अशी मागणी मुल्ला यांनी केली आहे.गोमेकॉच्या शवागरा मधील मृतदेह गायब होण्यामागे अवयव काढून विकणारे रॅकेट तर कार्यरत नाही ना, असा संशय देखील मुल्ला यांनी व्यक्त केला. हा प्रकार गंभीर असून त्याला आरोग्यमंत्री जबाबदार असल्याने कर्मचाऱ्यां पेक्षा त्यांच्यावरच एफआयआर दाखल करण्याची गरज असल्याचे मत मुल्ला यांनी व्यक्त केले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक; पाणी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाणार
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक; पाणी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाणार
Donald Trump On Israel PM: डोनाल्ड ट्रम्प इस्रायलच्या पंतप्रधानांवर भडकले; फोनवर बोलताना बेंजामिन नेतान्याहूंना चक्क वेडे म्हणाले, लेबनॉनवरील हल्ल्यांवरून वादाचा नवा अंक
डोनाल्ड ट्रम्प इस्रायलच्या पंतप्रधानांवर भडकले; फोनवर बोलताना बेंजामिन नेतान्याहूंना चक्क वेडे म्हणाले, लेबनॉनवरील हल्ल्यांवरून वादाचा नवा अंक
K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईंचा पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईंचा पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
देशात NEET घोटाळा, CBSEचा तमाशा सुरु असतानाच दिल्लीतील स्कूल ऑफ प्लॅनिंगच्या इमारतीत आगीचा भडका; कार्यालयातील आग संशयास्पद असल्याचा काँग्रेसचा आरोप
देशात NEET घोटाळा, CBSEचा तमाशा सुरु असतानाच दिल्लीतील स्कूल ऑफ प्लॅनिंगच्या इमारतीत आगीचा भडका; कार्यालयातील आग संशयास्पद असल्याचा काँग्रेसचा आरोप

व्हिडीओ

Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
Ramdas Athawale: आठवले कुठेही जाणार नाहीत, ते दगा करत नाहीत याचा अर्थ मला गृहीत धरावे असा नाही; रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा
आठवले कुठेही जाणार नाहीत, ते दगा करत नाहीत याचा अर्थ मला गृहीत धरावे असा नाही; रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा
K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईंचा पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईंचा पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
Raveena Tandon Mother Jewelry Worth 25 Lakhs Stolen: बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनच्या आईचे 25 लाखांचे दागिने चोरीला; घरकाम करणाऱ्या महिलेनंच मारला डल्ला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन यांच्या आईचे 25 लाखांचे दागिने घरातूनच लंपास; खळबळजनक प्रकार उघड
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
Embed widget