73वा स्वातंत्र्यदिन : यावर्षीही ट्विटरचा मराठीसह 10 भारतीय भाषांमध्ये विशेष हॅशटॅग
येत्या 15 ऑगस्ट रोजी आपण सर्वजण भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालयांमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्तच्या कार्यक्रमांची लगबग सुरु आहे.
मुंबई : येत्या 15 ऑगस्ट रोजी आपण सर्वजण भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालयांमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्तच्या कार्यक्रमांची लगबग सुरु आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त सोशल मीडियावरही असंख्य पोस्ट्स शेअर केल्या जातात, शुभेच्छा दिल्या जातात. त्यासाठी ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर विशेष हॅशटॅग वापरले जातात.
यंदा ट्विटरवर स्वातंत्र्यदिनानिमित्त वापरल्या जाणाऱ्या हॅशटॅगसोबत अशोकचक्राची इमोजीदेखील पाहायला मिळणार आहे. मराठीसह देशातल्या 10 प्रमुख भाषांमध्ये (इंग्लिश, हिंदी, गुजराती, तमिळ, बंगाली, पंजाबी, मल्याळम, ओडिया, कानडी, तेलुगू) हॅशटॅग बनवण्यात आले आहेत.
मागीलवर्षीदेखील या भाषांमध्ये विशेष हॅशटॅग बनवण्यात आले होते. त्यावेळी हॅशटॅगसह लालकिल्ल्याची इमोजी पाहायला मिळाली होती. यंदा लाल किल्ल्याऐवजी अशोक चक्राची इमोजी पाहायला मिळेल. हे हॅशटॅग 14 ऑगस्ट रोजी अॅक्टिव्ह होतील, असे ट्विटर इंडियातर्फे सांगण्यात आले आहे.
ट्विटरवर #IndiaIndependenceDay, #IDayIndia, #स्वतंत्रतादिवस, #સ્વતંત્રતાદિવસ, #சுதந்திரதினம், #ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದಿನ, #ਸੁਤੰਤਰਤਾਦਿਵਸ, #स्वातंत्र्यदिन, #സ്വാതന്ത്ര്യദിനം, #ସ୍ୱାଧୀନତାଦିବସ, #స్వాతంత్ర్యదినోత్సవం, #স্বাধীনতাদিবস हे हॅशटॅग वापरावे लागतील