एक्स्प्लोर
दिल्लीत गृहमंत्रालयाचा स्टिकर असलेल्या कारमध्ये तरुणीवर बलात्कार

नवी दिल्ली : दिल्लीतील निर्भयावरील गँगरेपला चार वर्ष पूर्ण होत आहेत. याच घटनेची पुनरावृत्ती दिल्लीत घडली आहे. गृहमंत्रालयाचा स्टिकर असलेल्या धावत्या कारमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याचं धक्कादायक वृत्त आहे. गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास दिल्लीतील गजबजलेल्या मोती बाग परिसरात बलात्कार झाल्याचा आरोप आहे. सीआयएसफच्या हेड कॉन्स्टेबलच्या नावे संबंधित कार असल्याची माहिती आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून वाहनही जप्त करण्यात आलं आहे. बलात्कार पीडिता एम्स रुग्णालयाबाहेर बसची वाट पाहत होती. त्यावेळी एका कारकडे तिने लिफ्ट मागितली. त्यानंतर धावत्या कारमध्ये तिच्यावर रेप झाल्याचा आरोप आहे. गेल्याच आठवड्यात दिल्लीतील याच मोती बाग परिसरात आणखी एक बलात्काराचं प्रकरण समोर आलं होतं. दक्षिण दिल्ली म्युनिसिपल रुग्णालयातील डॉक्टर आणि त्याच्या सहाय्यकाने एका इंटर्नवर नोकरीच्या आमिषाने बलात्कार केल्याचा आरोप आहे. https://twitter.com/ANI_news/status/809589065456549888
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















