एक्स्प्लोर
साक्षी महाराजांचा पराक्रम, सर्वांसमोर मुलीला जीन्स उतरवायला लावली !
लखनऊः उत्तर प्रदेशच्या उन्नावचे भाजप खासदार साक्षी महाराज नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. यावेळी त्यांनी अजबच पराक्रम केला आहे. जखम पाहण्याच्या उद्देशांनी साक्षी महाराज यांनी सर्वांसमोर एका मुलीला चक्क पँट उतरवायला लावली. जीन्स पँट उरवायला लावल्याचा एक व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे साक्षी महाराज यांच्यावर देशभरातून टीका होत आहे.
सर्वांसमोर जीन्स पँट उतरवण्याचे आदेश
जखम पाहण्यासाठी मुलीला आपली पँट काढायला सांगितली तेव्हा त्याठिकाणी प्रचंड गर्दी होती. त्यामुळे संबंधित मुलगी पँट काढण्यास घाबरत होती. तसेच उपस्थितांनीही पँट काढायला विरोध केला. बाजूच्या खोलीत जाऊन जखम पाहण्याची विनंती त्यांनी साक्षी महाराजांना केली. मात्र तरीही साक्षी महाराजांनी मुलीला त्याचठिकाणी जीन्स उतरवायला लावली.
झटापटीत मुलीला दुखापत
लखनऊ येथील भाजप कार्यकर्ता मैदान सिंग याला पोलिसांनी बनावट दारु विकल्याच्या आरोपात अटक केली होती. गावकऱ्यांनी या अटकेला विरोध केला. त्यावेळी गावकरी आणि पोलिसांत झटापट झाली होती. ज्या मुलीची जीन्स उतरवल्याचा आरोप साक्षी महाराजांवर आहे त्या मुलीलादेखील गावातील याच झटापटीदरम्यान दुखापत झाली होती.
साक्षी महाराजांवर कारवाई होणार ?
गावकरी आणि पोलिस यांच्यात झालेल्या वादाला अनुसरुन साक्षी महाराजांनी पोलिसांनाही धमकावल्याचा आरोप आहे. त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साक्षी महाराज आणि वाद
यापूर्वीच साक्षी महाराजांवर बलात्कार, खून असे अनेक आरोप आहेत. साक्षी महाराज आपल्या अभद्र वाणीमुळे नेहमी वादात असतात. काही दिवसांपूर्वीच साक्षी महाराजांनी भाजप सरकार आल्यावर सर्वांचा बदला घेऊ असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या बेताल वक्तव्यांचा फटका अनेकदा पक्षाला बसला आहे. त्यामुळे यावेळी तरी त्यांच्यावर कारवाई होते का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement