एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

गौरी लंकेशपूर्वी अभिनेते गिरीश कर्नाड हिट लिस्टवर?

मारेकऱ्यांच्या हिटलिस्टमध्ये गौरी लंकेश दुसऱ्या क्रमांकावर होत्या, तर ज्येष्ठ अभिनेते आणि लेखक गिरीश कर्नाड पहिल्या क्रमांकावर होते.

सोलापूर : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाच्या तपासात नवीन माहिती समोर आली आहे. मारेकऱ्यांच्या हिटलिस्टमध्ये गौरी लंकेश दुसऱ्या क्रमांकावर होत्या, तर ज्येष्ठ अभिनेते आणि लेखक गिरीश कर्नाड पहिल्या क्रमांकावर होते. बंगळुरु एसआयटीच्या हाती लागलेल्या डायरीमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी परशुराम वाघमारे आणि त्याच्या साथीदारांची डायरी एसआयटीला सापडली. त्या डायरीत गिरीश कर्नाड यांचं नाव होतं. कोण आहेत गिरीश कर्नाड? 80 वर्षीय गिरीश कर्नाड हे कन्नड भाषिक लेखक, अभिनेते, दिग्दर्शक आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांसोबत बॉलिवूडमध्येही त्यांनी ठसा उमटवला आहे. कर्नाड यांना 1974 मध्ये पद्मश्री, 1992 मध्ये पद्मभूषणने सन्मानित करण्यात आलं आहे. 1994 मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता. 1998 मध्ये कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. ययाति, तुघलक, हयवदन यासारखी त्यांनी लिहिलेली कन्नड नाटकं गाजली आहेत. गिरीश कर्नाड यांना दहावेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला आहे. टायगर जिंदा है, चॉक अँड डस्टर, शिवाय यासारख्या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केली आहे. 'उंबरठा' या स्मिता पाटील यांची मुख्य भूमिका असलेल्या मराठी चित्रपटातही त्यांनी काम केलं होतं. दरम्यान, बंगळुरु एसआयटीने गौरी लंकेश हत्या प्रकरणात काल दहाव्या संशयिताला अटक केली. कोडगू जिल्ह्यातील मडिकेरीमध्ये राहणाऱ्या राजेश बंगेराला बेड्या ठोकण्यात आल्या. त्याला 6 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. तपासादरम्यान बंगळुरु एसआयटीला एक डायरी मिळाली. या डायरीत गौरी लंकेश दुसऱ्या क्रमांकावर होत्या. या डायरीत नावं असलेले कट्टर हिंदुत्ववादाचे विरोधक आहेत. त्यांनी आपल्या वैचारिक मांडणीतून कट्टर हिंदुत्ववादाचा विरोधही केला आहे. गिरीश कर्नाड यांच्यासोबत राजकीय नेते बी. टी. ललिता नाईक, मठाधीश वीरभद्र स्वामी आणि जेष्ठ विचारवंत सी. एस. द्वारकानाथ यांची नावंही या डायरीत आहेत. देवनागरी लिपीत ही नावं डायरीत लिहिली आहेत. अर्थातच ही माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis Will Be New CM : 5 तारखेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार- पीटीआयBharat Gogawale News : सत्तेच्या बाहेर राहून शिंदेंचा काम करण्याचा मानस होता- भरत गोगावलेAsaduddin Owaisi Malegaon Speech : मोहन भागवत साहब आप कब शादी कर रहे हो? ओवैसींचं स्फोटक भाषणSpecial Report : Eknath Shinde On Shrikant Shinde : राजकीय डोह आणि पुत्रमोह! श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
Embed widget