एक्स्प्लोर

Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझादांची दुसरी इनिंग, नवा पक्ष काढणार असल्याची केली घोषणा 

ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे.

Ghulam Nabi Azad : ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, नवीन पक्षाचे नाव आणि झेंडा हे काश्मीरचे लोकं ठरवतील असेही आझाद यांनी म्हटलं आहे. काँग्रेसला रामराम केल्यानंतर प्रथमच गुलाम नबी आझाद हे आज जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kashmir) दौऱ्यावर आहेत. त्यांची आज सैनिक कॉलनीत जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी नवीन राजकीय पक्ष काढणार असल्याची घोषणा केली आहे.

आज जम्मू काश्मीरमध्ये माजी मुख्यमंत्री गुलाम नबी यांचे भव्य स्वागत केले. तसेच त्यांच्या समर्थनार्थ रॅली देखील काढण्यात आली. काँग्रेसला रामराम केल्यानंतर प्रथमच गुलाम नबी आझाद हे जम्मू काश्मीर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांची सैनिक कॉलनीत जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी नवीन राजकीय पक्ष काढणार असल्याची घोषणा केली. गुलाम नबी आझाद यांनी दिलेल्या राजीनाम्यात पक्षाबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला होता. प्रत्येक निर्णय कोणाशीही सल्लामसलत न करता घेतल्याचे आझाद म्हणाले होते. पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा अपमान होत असल्याचा आरोप देखील आझाद यांनी केला होता. 

पक्षासाठी 50 वर्ष काम केलं

मी काँग्रेस पक्षासाठी 50 वर्ष काम केलं आहे. या काळात मला जनतेनं खूप प्रेम दिलं असल्याचे आझाद म्हणाले. आज मी काहीही नाही, तरीही मला राज्यातील जनतेचे खूप प्रेम मिळत आहे. माझ्यामुळं अनेक जणांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत. मला इतकं प्रेम आणि पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानत असल्याचे आझाद यावेळी म्हणाले. आम्ही आमच्या रक्त आणि घामानं काँग्रेसची स्थापना केली आहे. काँग्रेस ही संगणकाने नाही, ट्विटरने नाही, संदेशांने नाही तर आमच्या घामानं स्थापन केली आहे. आमची बदनामी करणार्‍यांचीच पोहोच ही फक्त ट्विटर आणि संगणकावर असल्याचा टोला देखील आझाद यांनी यावेळी लगावला. दरम्यान, 26 ऑगस्टला गुलाम नबी आझाद यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आझाद हे नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर आज त्यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे.
 
महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
Embed widget