एक्स्प्लोर

Ghulam Haider: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर चले जावच्या आदेशाने सीमा हैदर भारतात अडचणीत; पहिला पाकिस्तानी पती काय म्हणाला?

Ghulam Haider: सीमा हैदरच्या पतीने पहलगाम हल्ल्याचा निषेध केला पण कोणत्याही पुराव्याशिवाय पाकिस्तानवर आरोप केले जात असल्याचे म्हटलं आहे.

Ghulam Haider: पाकिस्तानातून आपल्या प्रियकरासाठी भारतात आलेल्या  सीमा हैदरच्या पतीने आता आपल्या मुलांना पाकिस्तानात परत पाठवण्याची मागणी केली आहे. सध्या सीमा हैदर ग्रेटर नोएडाच्या राबुपुरा येथे तिचा प्रियकर सचिन मीनासोबत राहते. पाकिस्तानी सीमा हैदरचा पहिला पती गुलाम हैदरने पुन्हा एकदा आपल्या मुलांना पाकिस्तानात परत पाठवण्याची मागणी केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना हद्दपार करण्यात येत असताना, गुलाम हैदरने म्हटलं आहे की, भारताने व्हिसा घेऊन गेलेल्यांना परत जाण्यास सांगितले आहे. परंतु बेकायदेशीरपणे सीमेवर प्रवेश करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. हैदरने त्याची मुलेही पाकिस्तानी आहेत आणि त्यांनाही हद्दपार केले पाहिजे. सीमा हैदरच्या पतीने पहलगाम हल्ल्याचा निषेध केला पण कोणत्याही पुराव्याशिवाय पाकिस्तानवर आरोप केले जात असल्याचे म्हटलं आहे.

गुलाम हैदर यानी त्याच्या यूट्यूब चॅनलवर 37 मिनिटांचा व्हिडिओ बनवला आहे. पुन्हा एकदा सीमा हैदरला तुरुंगात टाकण्याची आणि त्याच्या मुलांना परत पाठवण्याची मागणी केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याच्या निर्णयाचा उल्लेख करताना ते म्हणाले, 'मोदी सरकारने आता जे केले आहे ते म्हणजे पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्यास सांगणे, हा दोन्ही देशांमधील विषय आहे. त्यांचे एकमेकांशी पटत नाही. मी मोदीजी आणि जयशंकरजींना सांगू इच्छितो की सीमा हैदर देखील तिच्या चार मुलांसह तिथे बेकायदेशीरपणे घुसली आहे. सीमा हैदरला सर्वात कठोर शिक्षा झाली पाहिजे. चारही मुले निर्दोष आहेत, ती पाकिस्तानी नागरिक आहेत. त्यांना परत पाठवले पाहिजे, असंही त्याने म्हटलं आहे. 

'मग त्याने व्हिसाशिवाय भारतात प्रवेश करावा'

गुलाम हैदरने पुढे म्हटलं आहे की, काम आणि व्यवसायासाठी व्हिसावर भारतात गेलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांच्या आत देश सोडण्यास सांगण्यात आले आहे. पण व्हिसाशिवाय बेकायदेशीरपणे सीमेवर प्रवेश करणाऱ्यांना सोडले जात आहे. यामुळे असा संदेश जाईल की व्हिसाशिवाय भारतात प्रवेश करणे चांगले. जर तुम्ही व्हिसाशिवाय गेलात तर मीडिया तुमच्याशी बोलेल आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे ठेवले जाईल. गुलाम हैदर यानी असेही म्हटले आहे की, जर त्याच्या चार मुलांना भारतीय नागरिकत्व दिले जात असेल तर सर्वप्रथम मुलांचे वडील गुलाम हैदरला नागरिकत्व मिळाले पाहिजे.

पहलगाम हल्ल्याबद्दल गुलाम हैदर यानी दुःख व्यक्त केले. पण त्याच वेळी पाकिस्तानचा बचाव केला आहे. तो म्हणाला, 'आम्हालाही दुःख आणि पश्चात्ताप झाला.' कोणी कोणाची हत्या केली याचा तपास झाला पाहिजे. कोणी मारले हे आम्ही सांगत नाही.कोणत्याही पुराव्याशिवाय विधाने करणे योग्य नाही. जेव्हा तुमच्याकडे पुरावेच नाहीत तेव्हा तुम्ही पाकिस्तानला दोष कसा देऊ शकता? दोन्ही देशांमधील बंधुता बिघडवण्यास भारतीय मीडिया जबाबदार आहे. असे आरोप करणे चांगले नाही. हल्ला कोणी आणि कसा केला हे आम्हाला माहित नाही. दोन मिनिटांत, कोणताही पुरावा नसतानाही पाकिस्तानवर दोषारोप केला जातो. काहीही न करता. सगळे म्हणतात. जोपर्यंत गोष्टी उघडकीस येत नाहीत तोपर्यंत कोणीही असा कोणताही निर्णय घेऊ नये ज्यामुळे कोणाचेही नुकसान होऊ शकेल. तुम्ही तुमचा भाऊबंदकी संपवू नये, असंही त्याने पुढे म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

बाहेर पाऊस पडत होता, ऐकमेकांना ढकलाढकली सुरु होती, कोलकातामध्ये चेंगराचेंगरीचा घटना नेमकी कशी घडली?  
बाहेर पाऊस पडत होता, ऐकमेकांना ढकलाढकली सुरु होती, कोलकातामध्ये चेंगराचेंगरीचा घटना नेमकी कशी घडली?  
कोलकातामध्ये मोठी दुर्घटना, गर्दीमुळं दुर्गा पूजा मंडपात चेंगराचेंगरी, तब्बल 18 जणांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी
कोलकातामध्ये मोठी दुर्घटना, गर्दीमुळं दुर्गा पूजा मंडपात चेंगराचेंगरी, तब्बल 18 जणांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget