(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jagan Mohan Reddy : सत्ता जाताच माजी सीएम जगनमोहन रेड्डींच्या घरावर बुलडोझर; बेकायदा बांधकामाच्या तक्रारीनंतर कारवाई!
Jagan Mohan Reddy : हैदराबादमधील लोटस पॉन्डमध्ये फूटपाथ आणि रस्ता बेकायदेशीरपणे बांधण्यात आला, त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागला होता.
Jagan Mohan Reddy : ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेने राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वायएसआरसीपी अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांचे बेकायदेशीर बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. लोटस पॉण्ड येथील जगन मोहन रेड्डी यांच्या निवासस्थानासमोर त्यांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर अतिक्रमण करून ते बांधण्यात आले होते, त्यामुळे जनतेला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते.
अतिक्रमणाच्या तक्रारीनंतर कारवाई
अतिक्रमण आणि रस्त्याच्या बांधकामाबाबत नगर परिषदेकडे अनेक तक्रारी आल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. जगनमोहन रेड्डी यांच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या सुरक्षेचा विचार करून ही रस्त्याच्या कडेला खोली बांधण्यात आली होती. आंध्र प्रदेशात जगन मोहन रेड्डी यांच्या पराभवानंतर सुरक्षा नव्हती. त्यामुळे पोलिसांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांनी त्यांचे अवैध बांधकाम पाडले.
Hyderabad: GHMC demolishes illegal structures at Lotus Pond, meant for former Andhra Pradesh CM Y.S. Jagan Mohan Reddy's security pic.twitter.com/ntzZYytdsM
— IANS (@ians_india) June 15, 2024
हैदराबादमधील लोटस पॉन्डमध्ये फूटपाथ आणि रस्ता बेकायदेशीरपणे बांधण्यात आला, त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. यापूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या सरकारने अनेकवेळा इशारा दिला आहे की, बेकायदेशीर बांधकामांना कुठेही दुर्लक्ष केले जाणार नाही. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने तेथे बांधलेले तीन शेड बुलडोझरच्या सहाय्याने पाडण्यात आले.
निवडणुकीत पक्षाची कामगिरी खराब झाली
आंध्र प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांच्या YSRCP पक्षाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. राज्यातील 175 विधानसभा जागांपैकी त्यांच्या पक्षाला केवळ 11 जागा मिळाल्या. तर तेलगू देसम पार्टी (टीडीपी) 135 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला. पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाला 21 तर भाजपला 8 जागा मिळाल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या