TMC MP Yusuf Pathan : बंगालमध्ये खासदार होताच युसूफ पठाण गुजरातमध्ये वादात अडकला; नेमकं घडलं तरी काय?
TMC MP Yusuf Pathan : व्हीएमसीने 6 जून रोजी नोटीस दिली होती, मात्र गुरुवारी त्यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. विशेष म्हणजे भाजपचे माजी नगरसेवक विजय पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.
TMC MP Yusuf Pathan : गुजरातमधील भाजपशासित वडोदरा महानगरपालिकेने (व्हीएमसी) (Vadodara Municipal Corporation) माजी भारतीय क्रिकेटपटू आणि बहरामपूर टीएमसी लोकसभा खासदार युसूफ पठाण (TMC Lok Sabha MP Yusuf Pathan) यांना नोटीस बजावली आहे. वडोदरा महानगरपालिकेने (VMC) एका भूखंडावरील कथित अतिक्रमणाबाबत ही नोटीस जारी केली आहे. या प्रकरणाबाबत शहर नियमानुसार मनपाने हा भूखंड आपला असल्याचे म्हटले आहे. व्हीएमसीने 6 जून रोजी नोटीस दिली होती, मात्र गुरुवारी (13 जून) त्यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. विशेष म्हणजे भाजपचे माजी नगरसेवक विजय पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.
भूखंडावरून वाद पेटला
या प्रकरणाबाबत विजय पवार म्हणाले, "मला युसूफ पठाण यांच्याशी कोणतीही अडचण नाही, मात्र टीपी 22 अंतर्गत तांदळजा परिसरात व्हीएमसीचा एक निवासी भूखंड आहे. युसूफ पठाण यांनी 2012 मध्ये या भूखंडाची मागणी केली होती, कारण हा भूखंड त्यांच्या घराला लागूनच आहे. ते विकत घेण्यासाठी 57,000 रुपये प्रति चौरस मीटर देऊ केले. ते पुढे म्हणाले, 'तेव्हा व्हीएमसीने हा प्रस्ताव मंजूर केला होता आणि तो सर्वसाधारण सभेतही मंजूर झाला होता, परंतु अशा बाबतीत अंतिम अधिकार राज्य सरकारला आहे आणि त्यांच्याकडून कोणतीही मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. मात्र, त्यावेळी व्हीएमसीने भूखंडाला कुंपण घातले नव्हते.
भूखंडाभोवती कंपाउंड वॉल बांधून अतिक्रमण
ते म्हणाले, 'मला आता समजले आहे की, युसूफ पठाणने भूखंडाभोवती कंपाउंड वॉल बांधून अतिक्रमण केले आहे. या कारणास्तव मी महापालिकेला चौकशी करण्यास सांगितले आहे. व्हीएमसी स्थायी समिती अध्यक्षा शीतल मिस्त्री म्हणाल्या, आम्ही नोटीस बजावली आहे. आम्ही काही काळ थांबू आणि नंतर कारवाई करू. ही जमीन व्हीएमसीची असून ती आम्ही परत घेऊ.
इतर महत्वाच्या बातम्या