एक्स्प्लोर
पत्नी आणि प्रेयसी एकत्र, डॉक्टरला बेदम चोप
पत्नीसोबतच्या वादानंतर या डॉक्टरची सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्लीत राहणाऱ्या एका तरुणीशी मैत्री झाली.
गाझियाबाद : विवाहित असूनही पत्नीला धोका देऊन दुसऱ्या लग्नाच्या तयारीत असलेल्या एका डॉक्टरला चांगलाच चोप मिळाला. पत्नी आणि प्रेयसी एकत्र आल्याने डॉक्टरच्या दुसऱ्या लग्नाचा प्लॅन फसला. गाझियाबादमध्ये हा प्रकार घडला आहे.
सहा महिन्यांपासून पत्नी माहेरी!
डॉक्टर मूळचा मुंबईचा असून तो गाझियाबादमध्ये नोकरी करत होता. सुमारे दीड वर्षांपूर्वी त्याचं लग्न मुंबईचीच रहिवासी असलेल्या असिस्टंट प्रोफेसर तरुणीशी झाला होता. पण लग्नानतंर कुटुंबाची जबाबादारी पाहता तिने नोकरी सोडली आणि गृहिणीच्या भूमिकेत शिरली. या दरम्यान त्यांना एक मुलगा झाला. मात्र सहा महिन्यांपूर्वी वाद झाल्याने पत्नी माहेरीच राहत होती. तर डॉक्टरला गाजियाबादच्या नेहरुनगरमधील एका खासगी रुग्णालयात नोकरी मिळाली.
साखरपुडा आणि लग्नाची तारीखही ठरली होती!
पत्नीसोबतच्या वादानंतर या डॉक्टरची सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्लीत राहणाऱ्या एका तरुणीशी मैत्री झाली. भेटीगाठी झाल्या, मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पण डॉक्टरने तिला आपल्या पहिल्या लग्नाबाबत सांगितलं नाही. त्याने आपल्या कुटुंबाच्या माध्यमातून लग्नही ठरवलं. त्यांचा साखरपुडा ऑगस्ट आणि लग्न ऑक्टोबरमध्ये होणार होतं.
प्रेयसीच्या भाऊ आणि भावोजीकडून चोप
मात्र याचदरम्यान डॉक्टरच्या पत्नीला याबाबत समजलं. तिने नवऱ्याच्या प्रेयसीला संपूर्ण प्रकार सांगितला. यानंतर मंगळवारी (21 जून)रात्री उशिरा प्रेयसीचा भाऊ आणि भावोजीने राजनगर एक्सटेन्शनमधील एका सोसायटती राहत असलेल्या डॉक्टरच्या घरात जाऊन त्याला मारहाण केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement