Bhupinder Singh: प्रख्यात गझलकार आणि गायक भूपिंदर सिंह यांचे निधन
Bhupinder Singh Passes Away : भूपिंदर सिंह यांनी बॉलिवूडमधील अनेक गाणी गायली आहेत. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
मुंबई: बॉलिवूडमधील प्रख्यात गायक आणि गझलकार भूपिंदर सिंह यांचं आज निधन झालं. पत्नी मिताली सिंह यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते अनेक आजारांचा सामना करत होते, त्यांना युरिनरी इन्फेक्शनही झालं होतं. अखेर आज मुंबईमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या मृतदेहावर आज रात्री 12.30 मिनिटांनी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
गायक भूपिंदर सिंह यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1940 रोजी अमृतसर येथे झाला. वडील नत्था सिंह यांच्याकडून त्यांना संगीताचं शिक्षण मिळालं. ते लहानपणापासून गिटार वाजवण्यात एक्सपर्ट होते. ते बॉलिवूडमधील नावाजलेले गायक असून त्यांच्या नावावर अनेक हिट गाणी आहेत. त्यांनी गायलेल्या गझलमुळे त्यांना एक विशेष ओळख मिळाली आहे. त्यांच्या पत्नी मिताली सिंह यादेखील प्रख्यात गायिका आहेत. पत्नी मिताली यांच्यासोबत त्यांनी गझल गायनाचे शेकडो कार्यक्रम केले आहेत.
भूपिंदर सिंह यांनी बॉलिवूडमधील मौसम, सत्ते पे सत्ता, अहिस्ता अहिस्ता, दुरीयाँ, हकिकत अशा अनेक चित्रपटातील गाणी गायली आहेत.
- भूपिंदर सिंह यांनी गायलेली प्रसिद्ध गाणी
- चुरा लिया है तुमने जो दिल को
- दम मारो दम
- महबूबा-महबूबा
- दिल ढूंढता है फिर वही फुरसत के रात दिन
- एक अकेला इस शहर में रात में और दोपहर में
- नाम गुम जाएगा,
- करोगे याद तो,
- मीठे बोल बोले
- किसी नजर को तेरा इंतजार
- कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता
महत्त्वाच्या बातम्या: