'किसी नजर को तेरा इंतजार…' गीत गाणारे गजल गायक भूपिंदर सिंह यांचे निधन, ही आहेत त्यांनी गायलेली प्रसिद्ध गाणी
Singer Bhupendra Singh: सोमवारी रात्री मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ पार्श्वगायक भूपिंदर सिंह यांचे मुंबईत निधन झाले.
Singer Bhupendra Singh: सोमवारी रात्री मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गजल गायक भूपिंदर सिंह यांचे निधन झाले आहे. मुंबईतील क्रिटी केअर रुग्णालयात त्यांचे निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची पत्नी आणि गायिका मिताली सिंह यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. भूपिंदर सिंह हे प्रसिद्ध संगीतकार आणि प्रामुख्याने गझल गायक होते. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन देखील केले आहे.
भूपिंदर सिंह यांनी लहानपणीच त्यांच्या वडिलांकडून गिटार वाजवायला शिकले. त्यांचे वडीलही संगीतकार होते. नंतर ते दिल्लीला गेले जेथे त्यांनी ऑल इंडिया रेडिओसाठी गायक आणि गिटार वादक म्हणून काम केले. 1964 मध्ये संगीत दिग्दर्शक मदन मोहन यांनी भूपिंदर यांना आकाशवाणीचे निर्माते सतीश भाटिया यांच्या डिनर पार्टीत गाताना ऐकले. यानंतर त्यांनी भूपिंदर यांना मुंबईत बोलावले आणि मोहम्मद रफी, तलत मेहमूद आणि मन्ना डे यांच्यासोबत 'होके मजबूर उसने मुझे बुलाया होगा' गाण्याची संधी दिली.
भूपिंदर सिंह यांनी गुलजार यांनी लिहिलेल्या अशा अनेक गजलांना आवाज दिला आहे, जे लोक आजही ऐकतात. त्यांनी किसी 'नजर को तेरा इंतजार आज भी है', 'हवा गुजर गयी पत्ते थे कुछ हिले भी नहीं', 'कभी किसिको मुकम्मल जहा नही मिलता' आणि 'राहों पे नजर रखना' अशा अनेक गजलांना आपला आवाज दिल आहे. त्या काळातील प्रसिद्ध संगीतकार आरडी बर्मन यांच्यासोबत भूपिंदर सिंह यांच्या कामालाही चांगलीच प्रसिद्धी मिळाली. 'दिल ढूढता है फिर वही फुर्सत के रात-दिन..' असो किंवा 'घरौंदा' चित्रपटातील 'दो दीवाने शहर में..'हे गाणे असो, भूपिंदर यांनी आपल्या आवाजाने ही गाणी आणखी सुंदर आणि संस्मरणीय बनवली.
इतर महत्वाची बातमी:
Bhupinder Singh: प्रख्यात गझलकार आणि गायक भूपिंदर सिंह यांचे निधन
PM Modi In Navy Program: राष्ट्रीय संरक्षण आता फक्त सीमेपुरते मर्यादित राहिलेले नाही: पंतप्रधान मोदी
'मला बलात्कार आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत', नुपूर शर्मा यांची सर्वोच्च न्यायालयात धाव