Ganesh Chaturthi: बेंगळुरूच्या चामराजपेट मैदानात गणेश चतुर्थीच्या पूजेला परवानगी नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Ganesh Chaturthi Celebrations: बेंगळुरूमधील चामराजपेट मैदानावर गणेश चतुर्थीच्या पूजेला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली नाही.
Ganesh Chaturthi Celebrations: बेंगळुरूमधील चामराजपेट मैदानावर गणेश चतुर्थीच्या पूजेला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली नाही. कर्नाटक वक्फ बोर्डाने ही जागा आपली मालमत्ता असल्याचे सांगत म्हटले की, वर्षानुवर्षे येथे ईदची नमाज अदा केली जाते. आज यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने जमिनीवर यथास्थिती ठेवण्याचे आदेश देत हे प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयाकडे परत पाठवले आहे.
तत्पूर्वी उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने मैदानात यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु खंडपीठाने सरकारला पूजेसाठी परवानगी मागणाऱ्या लोकांच्या अर्जांवर विचार करण्यास सांगितले होते. यानंतर राज्य सरकारने 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी पूजेला परवानगी दिली होती. मात्र आता पुन्हा यासंबंधित परवानगी नाकारण्यात आली आहे.
वक्फ बोर्डाचा दावा
वक्फ बोर्डाने याचिकेत म्हटले होते की, मैदान ही आपली मालमत्ता आहे. 1964 पासून येथे ईदची नमाज अदा केली जात आहे. पूजेमुळे जातीय तणाव निर्माण होऊ शकतो.
सरकारचा दावा
तसेच उच्च न्यायालयात राज्य सरकारने वक्फ बोर्डाचा दावा वादग्रस्त असल्याचं सांगितलं होत. सरकारने म्हटले होते की, शासनाला पूजेला परवानगी देण्याचा विचार करण्यापासून रोखता येणार नाही.
SC ने नहीं दी बंगलुरू के चमाराजपेट मैदान में गणेश चतुर्थी पूजा की अनुमति। कर्नाटक वक्फ बोर्ड ने जगह को अपनी संपत्ति बताते हुए कहा था कि वहां सालों से ईद की नमाज़ हो रही है। SC ने ज़मीन में यथास्थिति बनाए रखने का आदेश देते हुए मामला वापस कर्नाटक HC भेजा..1/2
— Nipun Sehgal (@Sehgal_Nipun) August 30, 2022
इससे पहले HC की सिंगल बेंच ने मैदान में यथास्थिति बनाए रखने का आदेश दिया था, लेकिन डिवीजन बेंच ने सरकार को पूजा की अनुमति मांग रहे लोगों के आवेदन पर विचार करने कहा था। इसके बाद राज्य सरकार ने 31 अगस्त-1 सितंबर को पूजा की इजाज़त दे दी थी। SC के आदेश के बाद अब पूजा नहीं होगी..2/2
— Nipun Sehgal (@Sehgal_Nipun) August 30, 2022
इतर महत्वाच्या बातम्या:
Congress President Election: शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार का? याबाबत काय म्हणाले ते जाणून घ्या
देशात दर तासाला 5 जणांच्या आत्महत्या, तर पंतप्रधानांच्या मित्राच्या संपत्तीत तासाला 85 कोटींची भर; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा