एक्स्प्लोर
Advertisement
खादीच नाही नोटांवरुनही गांधीजी गायब होतील : अनिल विज
चंदीगड : साक्षी महाराजानंतर आता हरियाणातील भाजप नेत्याने पुन्हा वादग्रस्त आणि धक्कादायक विधान करुन नवा वाद ओढावून घेतला आहे. लवकरच गांधीजी नोटांवरुनही गायब होतील, असं विधान या महाशयांनी केलं आहे. अनिल वीज असं त्यांचं नाव असून हरियाणा सरकारमध्ये ते आरोग्यमंत्री आहेत.
महत्त्वाचं म्हणजे जेव्हापासून नोटांवर गांधींची प्रतिमा आली आहे, तेव्हापासूनच नोटांचं अवमूल्यन झाल्याचं अनिल वीज बरळले आहेत. नोटांवरुनही गांधीजींचा फोटो हटवायला हवा. लवकरच गांधीजी नोटांवरुनही गायब होतील, असं विधान अनिल विज यांनी केलं आहे.
खादी ग्रामोद्योगाचं कॅलेंडर आणि डायरीवरुन गांधींऐवजी मोदींचं छायाचित्र प्रसिद्ध झालं आहे, तेव्हापासून हा वाद चर्चेत आहे. खादी ग्रामोद्योगाला महात्मा गांधी यांच्या नावामुळेच उतरती कळा लागल्याच अनिल विज म्हणाले.
खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडर, डायरीवर गांधींऐवजी मोदींचा फोटो
मोदींमुळे खादीच्या विक्रीत वाढ! खादीची ब्रॅण्ड इमेज बनवण्याचा पंतप्रधान मोदींचा निर्णय चांगला आहे. गांधीजींचा खादीवर पेटंट नाही. खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडर आणि डायरीवर मोदींच्या फोटोनंतरच खादीच्या विक्रीत 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा चांगला निर्णय आहे, नोटांवरुनही गांधीची लवकरच गायब होतील गांधीमुळे नोटांचं अवमूल्यन झाल्याचं अनिल विज म्हणाले. जर असं आहे, तर भाजप सरकाने नोटांवर गांधीजींचा फोटो का छापला, असा प्रश्न विचारलं असता विज म्हणाले की, हळूहळू तिथूनही गांधीजी गायब होतील.गांधींचा फोटो हटवणं म्हणजे मोदींची हुकूमशाहीकडे वाटचाल : शिवसेना
...म्हणून नोटांवरुन गांधीजींना हटवाच : तुषार गांधी अनिल विज यांच्या विधानवर प्रतिक्रिया देतना पणतू तुषार गांधी म्हणाले की, "हे वक्तव्यच बाष्कळ आहे. पण मलाही वाटतं की नोटांवरुन गांधीजींना हटवावं, कारण काळापैसा आणि भ्रष्टाचारांच्या प्रकरणात नोटांवरील गांधीजींची प्रतिमा मलिन होते." दरम्यान, चोहोबाजूंनी टीका झाल्यानंतर अनिल विज यांनी त्यांचं विधान मागे घेतलं आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement