Gallantry Awards 2021 : गलवान खोऱ्यात हौतात्म्य मिळालेल्या कर्नल संतोष बाबू यांना महावीर चक्र, 4 शहीदांना वीर चक्र देऊन गौरव
Gallantry Awards 2021 : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज संरक्षण अलंकरण पुरस्कार प्रदान करण्यात आले.
Gallantry Awards 2021 : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज संरक्षण अलंकरण पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये संरक्षण मंत्रालयाच्या वतीने ‘संरक्षण अलंकरण पुरस्कार -2020’ चे वितरण करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात उल्लेखनीय शौर्य, दुर्दम्य साहस आणि समर्पण वृत्तीच्या प्रदर्शनासाठी अधिकारी व जवानांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती भवनमध्ये शूर सैनिकांच्या आठवणींनी वातावरण भावूक झाले होते. लदाखमध्ये गलवान खोऱ्यात ऑपरेशन स्नो लेपर्डदरम्यान हौतात्म्य प्राप्त झालेले कर्नल संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पत्नी आणि आईकडे हा पुरस्कार सपूर्द केला. महावीर चक्र दुसरा सर्वात मोठा पुरस्कार आहे.
गेल्यावर्षी 15,16 जूनदरम्यान रात्री चीन सैनिकांसोबत झालेल्या चकमकीमध्ये कर्नल संतोष बाबूंसह २० भारतीय जवान शहीद झाले होते. तसेच भारतीय सैनिकांनी आपले सामर्थ्य, साहस दाखवून चीनी सैनिकांचे नुकसान केले होते. ऑपरेशन स्नो-लॅपर्डदरम्यान वीरमरण आलेल्या जवानांचा गौरव करण्यात आला. कर्नल संतोष बाबू यांना महावीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर अन्य पाच जवानांना मरणोत्तर वीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
#WATCH | Col Santosh Babu accorded Mahavir Chakra posthumously for resisting Chinese Army attack while establishing an observation post in the face of the enemy in Galwan valley in Ladakh sector during Operation Snow Leopard.
— ANI (@ANI) November 23, 2021
His mother and wife receive the award from President. pic.twitter.com/vadfvXBz9M
जम्मू काश्मीरमधील केरन सेक्टरमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्थान घालणारे अन् दोन दहशतवाद्यांना जखमी करणारे 4 पॅरा स्पेशल फोर्सचे सुभेदार संदीव कुमार यांना मरणोत्तर किर्ती चक्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या पत्नीकडे हा पुरस्कार प्रदान केला. हवलदार के. पलानी यांना या कार्यक्रमात मरणोत्तर वीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या पत्नीकडे पुरस्कार सपूर्द केला. गतवर्षी जूनमध्ये गलवान खोऱ्यात ऑपरेशन स्नो लेपर्डदरम्यान वलदार पलानी यांना वीरमरण आलं होतं.
या जवानांना वीरचक्र -
नायब सूभेदार नूदूराम सोरेन (16 बिहार)
हवलदार के. पिलानी (81 फील्ड रेजीमेंट)
नायक दीपक कुमार ( आर्मी मेडिकल कोर-16 बिहार)
शिपाई गुरतेज सिंह (3 पंजाब)
हवालदार तेजेंद्र सिंह (3 मीडियम रेजीमेंट)