एक्स्प्लोर

G20 Summit 2023: आजपासून G-20 शिखर परिषद सुरू! जो बायडन, ऋषी सुनक यांच्यासह अनेक जागतिक नेते दिल्लीत पोहोचले, PM मोदींची भेट

G20 Summit 2023 in Delhi: दिल्लीतील प्रगती मैदानाच्या भारत मंडपम येथे G-20 शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी अनेक जागतिक नेते भारतात पोहोचले आहेत

G20 Summit 2023 : देशाची राजधानी दिल्ली G-20 शिखर परिषदेचे यजमानपदासाठी सज्ज आहे. आज 9 आणि उद्या 10 सप्टेंबर रोजी प्रगती मैदानाच्या भारत मंडपममध्ये या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्यासह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) हे राज्य प्रमुखांच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी शुक्रवारी (8 सप्टेंबर) दिल्लीत पोहोचले आहेत. या परिषदेत जगातील अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी होणार आहेत. यानिमित्त नवी दिल्ली परिसरातही गुरुवारी रात्रीपासून अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राजधानीत होणाऱ्या G-20 परिषदेदरम्यान सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडेकोट ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे. परिषदेला उपस्थित काही परदेशी पाहुण्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी द्विपक्षीय बैठकही घेतली. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांचा समावेश होता.

पंतप्रधान मोदी आणि जो बायडन यांची भेट, काय चर्चा झाली?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे दिल्ली विमानतळावर केंद्रीय मंत्री जनरल व्ही के सिंग यांनी स्वागत केले. यानंतर बायडन पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी संध्याकाळी उशिरा पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले. जिथे पंतप्रधान मोदींनी त्यांचे जोरदार स्वागत केले. द्विपक्षीय चर्चेत दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या विविध मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर पोस्ट केले की, "राष्ट्रपती बायडन यांचे स्वागत करताना आनंद झाला. आमची बैठक अतिशय फलदायी ठरली. आम्ही अनेक विषयांवर चर्चा केली, ज्यामुळे भारत आणि अमेरिकामधील आर्थिक आणि लोकांशी संबंध वाढतील. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील. भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री जागतिक कल्याणासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत राहील. पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, दोन्ही राष्ट्राध्यशांच्या चर्चेत अनेक मुद्द्यांचा समावेश आहे, यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध आणखी घट्ट होतील. त्याच वेळी, व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आले की, पंतप्रधान मोदींनी आज राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे भारतात स्वागत केले. भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारीची पुष्टी केली. पंतप्रधान मोदींच्या जून 2023 च्या वॉशिंग्टन भेटीच्या अभूतपूर्व यशाबाबत तसेच त्यांच्या प्रगतीबद्दल त्यांचे कौतुक केले.

 

 

जी-20 परिषदेसाठी 'हे' नेते दिल्लीत पोहोचले

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस, कोमोरोसचे अध्यक्ष आणि आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष अझाली असाउमानी, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव, दक्षिण कोरियाचे अध्यक्ष युन सुक येओल, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे देखील दिल्लीत पोहोचले आणि त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. याशिवाय ओमानचे उपपंतप्रधान सय्यद फहाद बिन महमूद अल सैद, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला डी सिल्वा, चीनचे पंतप्रधान ली कियांग, जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा, सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग, इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडोही दिल्लीत पोहोचले. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस, आयएमएफ प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिएवा, नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे हेही उपस्थित होते. शुक्रवारी दिल्लीला पोहोचले.

पीएम मोदी 15 द्विपक्षीय बैठका घेणार

पीएम मोदी येत्या दोन दिवसांत 15 द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. या बैठकींमुळे विविध देशांसोबतच्या भारताच्या द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्याची, तसेच विकास सहकार्य आणखी मजबूत करण्याची संधी मिळेल, असे पंतप्रधानांनी यापूर्वी सांगितले होते. ब्रिटन, जपान, जर्मनी आणि इटलीच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठकीशिवाय पंतप्रधान मोदी शनिवारी G-20 सत्रात सहभागी होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत डिनर करणार आहेत.

कोणत्या मुद्द्यांवर जोर दिला जाईल?

G-20 नेते 9 आणि 10 सप्टेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या समूहाच्या वार्षिक शिखर परिषदेत महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा करतील. सध्याचे G-20 अध्यक्ष म्हणून भारत या शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. G-20 चे अध्यक्ष या नात्याने भारत सर्वसमावेशक वाढ, डिजिटल इनोव्हेशन, जलवायु आणि जागतिक आरोग्य यासारख्या विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत आहे.

'या' देशांचा G-20 मध्ये समावेश

या गटात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, यूके, अमेरिका आणि युरोपियन युनियन (EU) यांचा समावेश आहे. यावर्षी भारताने बांगलादेश, इजिप्त, नेदरलँड, मॉरिशस, नायजेरिया, सिंगापूर, स्पेन, संयुक्त अरब अमिराती, ओमान या देशांना विशेष आमंत्रित केले आहे.

मॉरिशसच्या पंतप्रधानांशीही द्विपक्षीय चर्चा

शुक्रवारी, पंतप्रधान मोदींनी मॉरीशियाचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांच्याशी द्विपक्षीय बैठकीत चर्चा केली, यावेळी ग्लोबल साउथचा आवाज पुढे नेण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. या भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर लिहिले की, पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ आणि माझी खूप चांगली भेट झाली. ते पुढे म्हणाले की, भारत-मॉरिशस संबंधांसाठी हे विशेष वर्ष आहे, कारण आमच्या राजनैतिक संबंधांना 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. आम्ही पायाभूत सुविधा, संस्कृती आणि इतर क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा केली. 

बांगलादेशच्या पंतप्रधानांची भेट, या मुद्द्यांवर चर्चा

यानंतर पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी द्विपक्षीय सहकार्यामध्ये विविधता आणण्यावर चर्चा केली. यामध्ये कनेक्टिव्हिटी आणि व्यावसायिक दुवे यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी फलदायी चर्चा झाल्याचे पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. मोदी म्हणाले, "गेल्या नऊ वर्षांत भारत-बांगलादेश संबंधांमध्ये झालेली प्रगती अतिशय आनंददायी आहे. आम्ही कनेक्टिव्हिटी, व्यावसायिक सहभागासह इतर मुद्द्यांवर चर्चा केली."  सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये, PMO ने म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींनी भारत-बांगलादेश द्विपक्षीय सहकार्यामध्ये विविधता आणण्यावर पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी फलदायी संभाषण केले. कनेक्टिव्हिटी, संस्कृती, जनसंपर्क यासह अनेक क्षेत्रात संबंध मजबूत करण्यावर त्यांनी सहमती दर्शवली.

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM Hacked : फसवणूक करणाऱ्यांना शपथ देणार का? ईव्हीएमवरून आरोप प्रत्यारोपSpecial Report Bangladeshi : मुंबईत नेमके किती बांगलादेशी? चालू वर्षात 177 बांगलादेशींना अटकTop 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaPankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
Embed widget