एक्स्प्लोर
पेट्रोल-डिझेलची लांब उडी, इंधन दरात मोठी वाढ
आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. आज पेट्रोल 48 पैशांनी तर डिझेल 55 पैशांनी महागलं आहे.
मुंबई: पेट्रोल-डिझेलच्या किमती दिवसेंदिवस हाताबाहेर जात आहेत. कारण आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. आज पेट्रोल 48 पैशांनी तर डिझेल 55 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईत आज पेट्रोल 87.39 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 76.51 रुपये प्रतिलिटरवर पोहोचलं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या संतापाचा पाराही दिवसेंदिवस वाढत आहे. काल पेट्रोलमध्ये 19 पैशांनी तर डिझेलमध्ये 21 पैशांनी वाढ झाली होती. आज त्यामध्ये पुन्हा मोठी वाढ झाली.
या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसनं 10 सप्टेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये विरोधीपक्षांसह अनेक सामाजिक संघटनांनीदेखील सहभागी होण्याचं आवाहन काँग्रेसकडून करण्यात आलं.
7 दिवसात पेट्रोल 1 रु 30 पैशांनी महागलं
गेल्या सात दिवसात पेट्रोल सातत्याने महागतंय. या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 सप्टेंबरला मुंबईतील पेट्रोल दर 86.09 रुपये प्रति लिटर इतका होता. आज हाच दर 87.39 रुपये झाला आहे. त्यामुळे गेल्या सात दिवसात पैशात वाढणाऱ्या पेट्रोलमध्ये प्रत्यक्षात 1 रुपये 30 पैशांची वाढ झाली आहे.
महाग पेट्रोल मिळणाऱ्या शहरांच्या यादीत अमरावती पहिल्या, सोलापूर आणि औरंगाबाद दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
महत्त्वाच्या शहरातील पेट्रोलचे दर
मुंबई – 87.39
पुणे – 87.18
ठाणे –
नाशिक – 87.77
औरंगाबाद – 88.44
नागपूर – 87.87
कोल्हापूर 87.57
सोलापूर – 88.44
अमरावती – 88.64
सिंधुदुर्ग – 88.30
अहमदनगर – 87.24
आंतरराष्ट्रीय बाजाराचा फटका
आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किमतीतील चढ-उतारामुळे, भारतातील इंधनाचे दर वाढत आहेत, असं पेट्रोल डिलर फेडरेशन ऑफ महाराष्ट्रचे उदय लोध यांनी सांगितलं.
शिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाचं अवमूल्यन होत असल्याने त्याचा थेट परिमाणही पेट्रोल-डिझेलच्या दरावर होत असल्याचं लोध म्हणाले. सरकारने एक्साईज ड्युटी आणि अन्य करात कपात करणं गरजेचं आहे, तरच इंधनाचे दर आटोक्यात येतील, असं ते म्हणाले.
संबंधित बातम्या
पेट्रोलची टिच्चून आगेकूच, शतकापासून 12 रुपये दूर!
पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरुच, अमरावती, सोलापुरात महाग पेट्रोल
इंधन दरवाढीचा फटका, भाजीपाला दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ
स्पेशल रिपोर्ट @830 | पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला, 'अच्छे दिन'चं स्वप्न हवेतच
डिझेलच्या दरात विक्रमी वाढ, पेट्रोलही महागलं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement