एक्स्प्लोर

Free Corona Booster Dose : पुढचे 75 दिवस मोफत बूस्टर डोस; कधी, कुठे, कसा मिळणार? सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर

Free Corona Booster Dose : पुढचे 75 दिवस 18 वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस मोफत मिळणार असून 15 जुलैपासून अंमलबजावणी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय.

Free Corona Booster Dose : केंद्र सरकारकडून आजपासून 'कोविड लस अमृत महोत्सव' अंतर्गत पुढचे 75 दिवस बूस्टर डोस (Booster Dose) मोफत दिला जाणार आहे. सगळ्या महानगरपालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर 30 सप्टेंबरपर्यंत मोफत डोस मिळणार आहे. 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना बूस्टर डोस घेता येणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली असून याच निमित्तानं देशात 75 दिवसांसाठी 'कोविड लस अमृत महोत्सव' राबवण्यात येणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी बूस्टर डोस घ्यावा, हाच त्यामागील मुख्य हेतू आहे. 

तुम्ही लसीचे दोन डोस घेतले असतील आणि ते घेऊन जर सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला असेल, तर केंद्र सरकारच्या निकषांनुसार तुम्ही कोरोना लसीचा बूस्टर डोस घेण्यास पात्र आहात. कोणत्याही महानगरपालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर जाऊन तुम्ही कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस घेऊ शकता. पण अद्यापही अनेक लोकांच्या मनात कोरोना (Covid-19) लसीच्या बूस्टर डोसबाबत संभ्रम आहे. कोरोना लसीच्या बूस्टर डोसबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. पण कोरोनापासून बचाव करण्यासाठी बूस्टर डोस घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 

आज आम्ही तुम्हाला बूस्टर डोसबाबत तुमच्या मनात असणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहोत. अनेकांच्या मनात बूस्टर डोसबाबत संभ्रम आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही बूस्टर डोस का महत्त्वाचा? डोस घेतल्यानं काही त्रास तर होणार नाही ना? पण खरंच बूस्टर डोस घेणं गरजेचं आहे? असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. जाणून घेऊया सर्व प्रश्नांची उत्तरं सविस्तर... 

बूस्टर डोस म्हणजे काय? 

सामान्यतः लसीचा एक किंवा दोन असे प्राथमिक डोस दिले जातात. लसीच्या प्राथमिक डोसनंतर दिल्या जाणाऱ्या डोसला बूस्टर डोस असं म्हटलं जातं. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बूस्टर डोस दिला जातो. 

बूस्टर डोस घेणं का आवश्यक?

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याचं नाव घेत नाही. अशातच आता कोरोनाचे अनेक व्हेरियंट्स आले आहेत. या प्रत्येक व्हेरियंटचा प्रभाव आणि लक्षणं वेगवेगळी असल्याचंही समोर आलं आहे. अशातच कोरोना प्रतिबंध लसीचे दोन डोस घेतल्यानंतर सहा महिन्यांनी त्यांचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कोरोना लसीचा तिसरा डोस म्हणजेच, बूस्टर डोस घेणं आवश्यक आहे. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढून कोरोनापासून बचाव होण्यास मदत होते. तसेच, लस घेतल्यानंतरही कोरोना झाल्यास गंभीर लक्षणं दिसत नाहीत. 

कोण घेऊ शकतं बूस्टर डोस?

18 वर्षांपेक्षा जास्त वयाची आणि कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण केलेली कोणतीही व्यक्ती बूस्टर डोस घेऊ शकते. याआधी बूस्टर डोस फक्त वयोवृद्धांसाठी आवश्यक असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र यावर्षी एप्रिलमध्ये सरकारनं मोठा निर्णय घेत बूस्टर डोस 18 वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस घेता येणार असल्याचं जाहीर केलं. 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी बूस्टर डोसचा पर्यायही खुला करण्यात आला आहे. 

लसीचा दुसरा डोस आणि बूस्टर डोसमधील अंतर किती? 

आरोग्य मंत्रालयां कोरोनाचा दुसरा डोस आणि बुस्टर डोस यांच्यातील अंतर 9 महिन्यांवरुन 6 महिन्यांवर आणलं आहे. जास्तीत जास्त लोकांनी बुस्टर डोस घ्यावा, या हेतूनं हे अंतर कमी करण्यात आलं आहे. यासोबतच केंद्र सरकारनं प्रत्येक व्यक्तीचं लसीकरण करण्यासाठी 1 जूनपासून 'हर घर दस्तक' मोहीम 2.0 सुरु केली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांच्या अभ्यासानुसार, कोरोनाच्या पहिल्या दोन डोसचा प्रभाव फक्त 6 महिने टिकतो. यानंतर व्यक्तीच्या शरीरातील अँटीबॉडीची पातळी कमी होते. अशा परिस्थितीत बूस्टर डोस घेणं आवश्यक आहे जेणेकरून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. 

कधी घ्यावा बूस्टर डोस? 

ज्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत आणि त्यांना दोन्ही डोस घेऊन सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ लोटला असेल त्या व्यक्ती बूस्टर डोस घेऊ शकतात. त्यासाठी त्यांना जवळच्या खाजगी लसीकरण केंद्रावर बूस्टर डोससाठी नोंदणी करु शकतात. 

बूस्टर डोससाठी किती पैसे मोजावे लागणार? 

कोरोनाचा बूस्टर डोस फक्त सरकारी हॉस्पिटलमध्येच मोफत मिळणार आहे. खासगी रुग्णालयात कोणी बूस्टर डोस घेतल्यास त्यासाठी त्यांना शुल्क भरावं लागणार आहे. खाजगी केंद्रांवर, कोविशील्ड आणि कोवॅक्सीनच्या बूस्टर डोससाठी 225 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. याशिवाय रुग्णालय स्वतंत्रपणे सेवा शुल्क देखील आकारू शकतं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींची टीका, मोदींता करारा जवाबZero Hour Rahul Gandhi vs Narendra Modi:राहुल गांधी यांचं वक्तव्य ते नरेंद्र मोदी यांची सडेतोड उत्तरZero Hour : अंबादास दानवेंचं निलंबन ते नार्वेकरांचं आमदारकीसाठी लॉबिंग; विधानपरिषदेत काय घडलं?Zero Hour Full : दानवेंचं निलंबन, ठाकरे-फडणवीसांची भेट ते मोदींचं भाषण; दिवसभरात काय घडलं? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget