एक्स्प्लोर
पुरात फॉर्च्युनर वाहून गेली, माजी आमदाराच्या मुलाचा मृत्यू
अलाहाबाद: उत्तर भारतात सध्या पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. अनेक भागात पुराचं थैमान आहे. उत्तर प्रदेशातील अलाहाबादेत पुराच्या पाण्यात थेट एक फॉर्च्युनर वाहून गेली.
यामध्ये एका माजी आमदाराच्या मुलासह दोघांचा मृत्यू झाला. तर एकाला वाचवण्यात यश आलं आहे. एक जण अद्याप बेपत्ता आहे.
मृतांमध्ये बहुजन समाज पार्टीचे नेते आणि माजी आमदार सी व्ही इनिस यांचा 30 वर्षीय मुलगा मिचेल उर्फ बाबा भैयाचा समावेश आहे. मिचेल हा एका शाळेचा संचालकही होता.
मिचेल त्याच्या तीन मित्रांसह फॉर्च्युनरमधून जात होता. त्याचवेळी अलाहाबादपासून सुमारे 25 किमी अंतरावर ही दुर्घटना घडली.
बुडालेल्या फॉर्च्युनरचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. ही कार गंगा आणि यमुना नदीच्या वेगवान पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement