एक्स्प्लोर

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची एसपीजी सुरक्षा काढली!

एसपीजी सुरक्षा ही देशातील निवडक व्यक्तींनाच दिली जाते. देशाच्या सर्वात महत्त्वाच्या राजकारण्यांची सुरक्षा करणारं हे उच्च दर्जाचं पथक आता केवळ चार जणांच्या सुरक्षेसाठी असेल.

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहर सिंह यांची स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. त्यांना आता 'झेड प्लस' सुरक्षा देण्यात येणार आहे. म्हणजेच त्यांना सीआरपीएफचं सुरक्षाकवच असेल. सगळ्या गुप्तचर यंत्रणांकडून आढावा घेतल्यानंतर मनमोहन सिंह यांना 'एसपीजी'ऐवजी 'झेड प्लस' सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला. "सुरक्षेसंदर्भातील निर्णय पूर्णत: प्रोफेशनल आधारावर घेतला आहे. ठराविक काळानंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला जात. ही सामान्य प्रक्रिया आहे. याअंतर्गत सुरक्षा कमी करणं किंवा वाढवण्याचा निर्णय घेतला जातो," असं गृहमंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे. मनमोहन सिंह यांना झेड प्लस सुरक्षा मिळणार मनमोहन सिंह यांची एसपीजी सुरक्षा काढण्यात आली असली तरी त्यांना 'झेड प्लस' सुरक्षा मिळणार आहेच. सध्याच्या सुरक्षेचा आढावा ही निर्धारित काळात होणारी प्रक्रिया आहे. गुप्तचर यंत्रणांनी घेतलेला आढावा आणि धोक्याची शक्यता पाहून हा निर्णय घेतला जातो. "2004 ते 2014 ही दहा वर्ष देशाचं पंतप्रधानपद सांभाळणारे डॉ. मनमोहन सिंह यांनाच आपल्या सुरक्षेविषयी फार चिंता वाटत नाही. त्यामुळे ते सरकारचा निर्णय मान्य करतील," असं त्यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं. 2014 मध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर मनमोहन सिंह यांच्या मुलीने 2014 मध्येच एसपीजी सुरक्षा नाकारली होती. त्याचप्रमाणे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मुलीनेही सुरक्षा कमी केली होती. देशात आता केवळ चार जणांनाच एसपीजी सुरक्षा एसपीजी सुरक्षा ही देशातील निवडक व्यक्तींनाच दिली जाते. देशाच्या सर्वात महत्त्वाच्या राजकारण्यांची सुरक्षा करणारं हे उच्च दर्जाचं पथक आता केवळ चार जणांच्या सुरक्षेसाठी असेल. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, त्यांची मुलं खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांचा समावेश आहे. एचडी देवेगौडा, व्हीपी सिंह यांचीही सुरक्षा काढली होती याआधी दोन दशकांपूर्वी माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि व्ही पी सिंह यांचीही एसपीजी सुरक्षा काढली होती. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना त्यांच्या निधनापर्यंत म्हणजेच 2018 पर्यंत एसपीजी सुरक्षा कायम होती. 1985 मध्ये एसपीजीची स्थापना स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमध्ये 3000 जास्त कर्मचारी असतात. धोक्याची शक्यता लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबालाही एसपीजी सुरक्षा देण्याची तरतूद आहे. 1984 मध्ये सुरक्षारक्षकांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या केल्यानंतर, केवळ पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी 1985 मध्ये एसपीजीची स्थापना करण्यात आली. मात्र 1991 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर एसपीजी कायद्यात बदल करण्यात आला. या बदलानुसार, माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबालाही 10 वर्ष सुरक्षा पुरवली जाईल. यानंतर 2003 मध्ये वाजपेयी सरकारने कायद्यात पुन्हा बदल करुन एसपीजी सुरक्षेचा कालावधी 10 वर्षांवरुन 1 वर्ष करण्यात आला किंवा सरकारने ठरवल्यानुसार धोक्याची शक्यता किती कमी-जास्त आहे, त्यादृष्टीने एसपीजी सुरक्षा देण्याचं निश्चित करण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात दुष्काळ जाहीर होताच राधाकृष्ण विखे पाटील दिल्लीत दाखल, पुत्रासह अमित शाहंची घेतली भेट, नेमकी काय झाली चर्चा? 
राज्यात दुष्काळ जाहीर होताच राधाकृष्ण विखे पाटील दिल्लीत दाखल, पुत्रासह अमित शाहंची घेतली भेट, नेमकी काय झाली चर्चा? 
Gyanesh Kumar: गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत चौफेर घेरताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची दोन आयुक्तांसोबत बैठक, महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला
गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत चौफेर घेरताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची दोन आयुक्तांसोबत बैठक, महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला
YouTuber ने लेकीवर पैसा उधळला, अंगावरील सोन्याचा Reel मधून दिखावा अन् चोरट्यांनी बरोबर डाव साधला! किलोभर सोन्यावर डल्ला, अन् रोकड सुद्धा लंपास
YouTuber ने लेकीवर पैसा उधळला, अंगावरील सोन्याचा Reel मधून दिखावा अन् चोरट्यांनी बरोबर डाव साधला! किलोभर सोन्यावर डल्ला, अन् रोकड सुद्धा लंपास
सर्वसामान्य लोकांचं कार घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार! टाटा मोटर्सकडून नवीन टाटा एरिस लॉंच, जबरदस्त लूक आणि फिचर
सर्वसामान्य लोकांचं कार घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार! टाटा मोटर्सकडून नवीन टाटा एरिस लॉंच, जबरदस्त लूक आणि फिचर

व्हिडीओ

Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
Lalbaugcha Raja Visarjan 2026: नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; मिरवणुकीला सुरुवात, कार्यकर्ते भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणच्या ऑगस्टच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 339 कोटी वितरीत, ऑगस्टचे 1500 रुपये कधी मिळणार?
लाडक्या बहिणींना ऑगस्टच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, सामाजिक न्याय विभागाकडून महत्त्वाचा शासन निर्णय जारी 
Ahilyanagar : 'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2026 | शनिवार
Gyanesh Kumar: गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत चौफेर घेरताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची दोन आयुक्तांसोबत बैठक, महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला
गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत चौफेर घेरताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची दोन आयुक्तांसोबत बैठक, महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला
YouTuber ने लेकीवर पैसा उधळला, अंगावरील सोन्याचा Reel मधून दिखावा अन् चोरट्यांनी बरोबर डाव साधला! किलोभर सोन्यावर डल्ला, अन् रोकड सुद्धा लंपास
YouTuber ने लेकीवर पैसा उधळला, अंगावरील सोन्याचा Reel मधून दिखावा अन् चोरट्यांनी बरोबर डाव साधला! किलोभर सोन्यावर डल्ला, अन् रोकड सुद्धा लंपास
Mamata Banerjee: इकडं नजरकैद केल्याचा ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप, तिकडं तृणमुलच्या आमदारावर चार महिन्यात तिसऱ्यांदा हल्ला, कारवर अंडी फेकली, म्हणाले हे जंगलराज
इकडं नजरकैद केल्याचा ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप, तिकडं तृणमुलच्या आमदारावर चार महिन्यात तिसऱ्यांदा हल्ला, कारवर अंडी फेकली, म्हणाले हे जंगलराज
Asian Games : कबड्डीत भारतानं दुसरं सुवर्णपदक मिळवलं, टीम इंडियाचा अटीतटीच्या लढतीत विजय, 40-34 नं इराणला हरवलं
कबड्डीत भारतानं दुसरं सुवर्णपदक मिळवलं, टीम इंडियाचा अटीतटीच्या लढतीत विजय, 40-34 नं इराणला हरवलं
Mumbai Ganpati Visarjan : मुंबईत विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचे सर्व नियम धुळीस, 'या' भागात नोंदवला गेला सर्वाधिक 107 डेसिबल आवाज!
मुंबईत विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचे सर्व नियम धुळीस, 'या' भागात नोंदवला गेला सर्वाधिक 107 डेसिबल आवाज
Embed widget