Shanti Bhushan Death: माजी कायदा मंत्री शांती भूषण यांचं निधन, वयाच्या 97 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Shanti Bhushan Death: ज्येष्ठ वकील आणि माजी कायदा मंत्री शांती भूषण (Shanti Bhushan) यांचे मंगळवारी निधन झालं आहे. त्यांनी आज संध्याकाळी 7 वाजता दिल्लीतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
Shanti Bhushan Death: ज्येष्ठ वकील आणि माजी कायदा मंत्री शांती भूषण (Shanti Bhushan) यांचे मंगळवारी निधन झालं आहे. त्यांनी आज संध्याकाळी 7 वाजता दिल्लीतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. शांती भूषण 97 वर्षांचे होते. गेले अनेक दिवसांपासून त्यांनी तब्यत ठीक नव्हती. त्यांनी मोरारजी देसाई (Morarji Desai) सरकारमध्ये, 1977 ते 1979 या दरम्यान देशाचे कायदा मंत्री (Law Minister) म्हणून काम केलं होतं.
शांती भूषण यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात एका प्रसिद्ध खटल्यात राजनारायण यांचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे 1974 मध्ये इंदिरा गांधी यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावा लागले. तत्पूर्वी, इंदिरा गांधी 1971 च्या सार्वत्रिक निवडणुकीत रायबरेली मतदारसंघातून निवडणूक जिंकल्या आणि पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. त्यावेळेची जनसंघाचे त्यांचे प्रतिस्पर्धी राजनारायण यांनी अलाहाबाद हायकोर्टात निवडणुकीत गैरव्यवहार करून आपला पराभव करण्यात आल्याचा आरोप करत खटला दाखल केला होता.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविरुद्ध खटला जिंकला
इंदिरा गांधींवर लाच घेतल्याचा आणि निवडणूक जिंकण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांनी केला. शांती भूषण यांनी राजनारायण यांच्यासाठी खटला लढवला आणि जिंकला. न्यायमूर्ती जगमोहन लाल सिन्हा यांनी इंदिरा गांधी यांची खासदारकी रद्द केली आणि त्यांना पुढील सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घातली. या निर्णयामुळे राजकीय विरोध झाला आणि पुढे भारतात आणीबाणी जाहीर झाली.
शांती भूषण यांचा राजकीय प्रवास
शांती भूषण हे काँग्रेस (ओ) आणि नंतर जनता पक्षाचे सदस्य होते. ते राज्यसभेचे खासदारही होते. 1980 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि 1986 मध्ये भाजपचा राजीनामा दिला.
वरिष्ठ वकील और देश के पूर्व कानून मंत्री शांति भूषण का निधन हो गया है। शाम लगभग 7 बजे दिल्ली में अपने घर पर हुआ निधन। 97 साल के शांति भूषण 1977 से 1979 के बीच मोरारजी देसाई की सरकार में कानून मंत्री रहे थे। जाने-माने वकील प्रशांत भूषण और जयंत भूषण उनके बेटे हैं।
— Nipun Sehgal (@Sehgal_Nipun) January 31, 2023
आम आदमी पक्षाचे संस्थापक सदस्य
शांती भूषण यांनी 2018 मध्ये 'मास्टर ऑफ रोस्टर' प्रणालीत बदल करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. प्रसिद्ध वकील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण हे त्यांचे पुत्र आहेत. शांती भूषण आणि प्रशांत भूषण हे आम आदमी पक्षाच्या (AAP) संस्थापक सदस्यांपैकी एक होते. नंतर त्यांनी पक्षापासून फारकत घेतली.