Champai Soren : अशोक चव्हाणांनंतर आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या गळाला; आजच मोठा निर्णय घेण्याची शक्यता
25 ऑगस्ट रोजी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर चंपाई यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. झारखंडमध्ये पोहोचल्यानंतर ते या सुरक्षा वर्तुळात राहतील.
Former Jharkhand chief minister Champai Soren : कर्नाटकात काँग्रेस आमदारांकडून सरकार पाडण्यासाठी भाजपवर आमदार खरेदीचा आरोप होत असतानाच झारखंडमध्ये माजी मुख्यमंत्री गळाला लावला आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन (Former Jharkhand chief minister Champai Soren) आजच (28 ऑगस्ट) झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) सोडू शकतात. चंपाई सोरेन दिल्लीहून रांचीला पोहोचले आहेत. चंपाई सोरेन 30 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये त्यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली होती. चंपाई सोरेन आगामी झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपत प्रवेश करत आहेत. हेमंत सोरेन यांची जेलमधून सूटका झाल्यानंतर सोरेन यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून ते नाराजे होते.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन झारखंडच्या हेमंत सोरेन सरकारवर मोठा आरोप केला. सरमा म्हणाले की, 'चंपाई सोरेन यांची हेरगिरी केली जात होती. दिल्ली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी दोघांनाही आपल्या ताब्यात ठेवले आहे. आसामचे मुख्यमंत्री हे भाजपच्या वतीने झारखंडचे सह-निवडणूक प्रभारी देखील आहेत. यापूर्वी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोमवारी रात्री सोशल मीडिया X वर लिहिले की, चंपाई सोरेन यांनी काही वेळापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. रांचीमध्ये ते अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर चंपाई यांना झेड प्लस सुरक्षा
वृत्तानुसार, 25 ऑगस्ट रोजी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर चंपाई यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. झारखंडमध्ये पोहोचल्यानंतर ते या सुरक्षा वर्तुळात राहतील. जमीन घोटाळ्याप्रकरणी विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन तुरुंगात गेल्यावर त्यांनी राज्याची जबाबदारी चंपाई सोरन यांच्याकडे दिली होती. 31 जानेवारी रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली. चंपाई सुमारे पाच महिने झारखंडचे मुख्यमंत्री होते. हेमंत तुरुंगातून बाहेर आल्यावर चंपाई सोरेन यांनी 3 जुलै रोजी राजीनामा दिला. 18 ऑगस्ट रोजी चंपाई सोरेन यांनी पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची पद्धत स्वाभिमानाला धक्का देणारी असल्याचे त्यांनी वर्णन केले होते.
चंपाई सोरेन यांचा भाजपला काय फायदा?
चंपाई सोरेन हे झामुमोचे ज्येष्ठ नेते आहेत. झारखंडच्या कोल्हान भागात त्यांना कोल्हन वाघ म्हणतात. कोल्हाणच्या 14 विधानसभा जागांवर चंपाई सोरेन यांचा प्रभाव आहे. सध्या झामुमोकडे चंपाई यांची बरोबरी करणारा नेता नाही. चंपाई सोरेन यांच्या उपस्थितीत कोल्हाणच्या 14 विधानसभा जागांवर भाजप आपली पकड मजबूत करू शकते.
इतर महत्वाच्या बातम्या