एक्स्प्लोर

Babul Supriyo Joins TMC: भाजप खासदार बाबूल सुप्रियो यांनी सोडली कमळाची साथ, 'तृणमूल'मध्ये प्रवेश

Babul Supriyo Joins TMC: भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांनी ममता बनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (टीएमसी)मध्ये प्रवेश केला आहे.

Babul Supriyo Joins TMC: भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांनी ममता बनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (टीएमसी)मध्ये प्रवेश केला आहे. टीएमसीचे राष्ट्रीय महासचिव आणि लोकसभा खासदार अभिषेक बनर्जी आणि राज्यसभा खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी बाबुल सुप्रियो यांना पक्षाचं सदस्यत्व दिलं आणि स्वागत केलं.  आसनसोल लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेल्या सुप्रियो यांच्या तृणमूल प्रवेशानं पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. 

बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. फेसबुक पोस्ट लिहून त्यांनी आपला निर्णय जाहीर केला होता. बाबुल सुप्रियो आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले होते की, राजकरणात न राहता देखील ते सामाजिक कार्य करू शकतात. ते कोणत्याही पक्षात जाणर नाहीत असंही त्यांनी सांगितलं होतं. मात्र आता त्यांच्या टीएमसी प्रवेश झाल्यानं भाजपला हा एक मोठा धक्का मानला जातो आहे.

Babul Supriyo Quits Politics | अलविदा... भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांचा राजकारणातून संन्यास

फेसबुक पोस्ट करुन दिले होते राजकीय निवृत्तीचे संकेत

आसनसोल लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाबुल सुप्रियो यांनी जुलै महिन्यात राजकीय निवृत्तीचे संकेत दिले होते. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होते की, "मी कोणत्याही पक्षात जाणार नाही.  मला कोणत्या पक्षाने बोलावलेले नाही. मी कुठेही जाणार नाही. समाजसेवा करण्यासाठी राजकरणात असण्याची आवश्यकता नाही." निवडणुकीअगोदरच पक्षाबरोबर माझे काही मतभेद होते, त्या गोष्टी निवडणुकीच्या अगोदरच सर्वांसमोर  उघड झाल्या होत्या. पराभवाची जबाबदारी घेत आहे, परंतु दुसरे नेते देखील जबाबदार असल्याचे बाबुल यांनी पोस्टमध्ये म्हटले होते.  खासदार पदाचा राजीनामा देऊन, मी माझे शासकीय निवसस्थान महिनाभरात सोडेल, असंही बाबुल सुप्रियो म्हणाले होते.

बाबुल सुप्रियो म्हणाले होते की, एकदा  विमान प्रवास करताना  रामदेव बाबांशी माझी चर्चा झाली. पश्चिम बंगालची निवडणूक भाजप गंभीरपणे घेत आहे. पण त्यांना एकही जागा मिळणार नाही, असं मी ऐकलं. तेव्हा  मला खूप वाईट वाटले.  तेव्हा असा विचार आला की जो बंगाली श्यामाप्रसाद मुखर्जी आणि अटल बिहारी वाजपेयींवर एवढं प्रेम करतो, तो भाजपला का निवडणुकीत एकही जागा देऊ शकत नाही, असे कसे होऊ शकते. विशेषत: जेव्हा नरेंद्र मोदीच पुढील पंतप्रधान असेल असं सर्व भारतीयांनी ठरवलेलं असताना बंगालने वेगळा विचार का करावा? असं विचार आला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
Sunny Leone Net Worth : ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
पावसामुळे मुंबई मेट्रो ठप्प, वादळी वाऱ्याने वाहतूक विस्कळीत; विमानसेवेतही अचानक बदल
पावसामुळे मुंबई मेट्रो ठप्प, वादळी वाऱ्याने वाहतूक विस्कळीत; विमानसेवेतही अचानक बदल
Congress on PM Modi : अडवाणी, मुरली मनोहर जोशीप्रमाणे मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सवाल
अडवाणी, जोशींप्रमाणे पीएम मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सBaramati Strong Room CCTV : बारामतीमधील स्ट्रॉगरुममधील सीसीटीव्ही 45 मिनिटानंतर सुरु :ABP MajhaWare Nivadnukiche Superfast News:लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024ABP Majha Headlines : 02 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
Sunny Leone Net Worth : ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
पावसामुळे मुंबई मेट्रो ठप्प, वादळी वाऱ्याने वाहतूक विस्कळीत; विमानसेवेतही अचानक बदल
पावसामुळे मुंबई मेट्रो ठप्प, वादळी वाऱ्याने वाहतूक विस्कळीत; विमानसेवेतही अचानक बदल
Congress on PM Modi : अडवाणी, मुरली मनोहर जोशीप्रमाणे मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सवाल
अडवाणी, जोशींप्रमाणे पीएम मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
डुकराची किडनी बसवलेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू,दोन महिन्यापूर्वीच झालं होतं ऑपरेशन
डुकराची किडनी बसवलेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू,दोन महिन्यापूर्वीच झालं होतं ऑपरेशन
Maharashtra Rain : सावधान! येत्या काही तासात नाशिक, पालघरसह 'या' भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
सावधान! येत्या काही तासात नाशिक, पालघरसह 'या' भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
Maharashtra Police Bharti : पोलिस भरतीमध्ये मोठी अपडेट; 'त्या' उमेदवारांना पोलिस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र देण्याची सूचना
पोलिस भरतीमध्ये मोठी अपडेट; 'त्या' उमेदवारांना पोलिस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र देण्याची सूचना
वादळ वारं सुटलं गं.. रायगडमध्ये अवकाळी, नाशिक, पालघर, पुणे घाटात पुढील 3-4 तासांत पावसाच्या सरी
वादळ वारं सुटलं गं.. रायगडमध्ये अवकाळी, नाशिक, पालघर, पुणे घाटात पुढील 3-4 तासांत पावसाच्या सरी
Embed widget