India-China Border Row : 'चीनने दिलेला शब्द पाळला नाही, त्यामुळेच...', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा 'ड्रॅगन'वर निशाणा
India-China Border Row : ऑस्ट्रियामध्ये एका मुलाखतीदरम्यान जयशंकर म्हणाले की, भारत आणि चीन यांच्यात सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल न ठेवण्याचे करार झाले आहेत.
S Jaishankar on India-China Border Row : भारत (India) आणि चीन (China) यांच्यामधील संघर्ष सर्वज्ञात आहे. 'ड्रॅगन'कडून नेहमीच काही ना काही कुरापती सुरुच असतात. चीनकडून वारंवार नियम मोडले गेल्याचं सांगत भारताचे परराष्ट्र मंत्री (Minister of External Affairs of India) एस जयशंकर (S Jaishankar) यांनी पुन्हा एकदा चीनवर निशाणा साधला आहे. एस जयशंकर म्हणाले की, चीनने सीमा मुद्द्यांवर भारतासोबत केलेल्या करारांचे पालन केले नाही. जयशंकर म्हणाले की, चीनने नियंत्रण रेषेवर (LAC) मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा वाढवल्या आहेत. केला. त्यामुळेच दोन्ही शेजाऱ्यांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. परराष्ट्रमंत्री जयशंकर सध्या ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सोमवारी (2 जानेवारी) ऑस्ट्रियामध्ये ORF ला मुलाखत दिली. या मुलाखतीत जयशंकर म्हणाले की, भारत आणि चीनमध्ये सीमा भागात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल न ठेवण्याबाबत करार झाले आहेत.
'चीनने करारांचे पालन केले नाही'
जयशंकर म्हणाले की, चीनने भारतासोबतच्या करारांचे पालन केले नाही आणि त्यामुळेच सध्या दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. जयशंकर म्हणाले, 'भारत आणि चीनमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) बदल न करण्याचा करार केला होता, पण चीनने नियंत्रण रेषेवर बांधकाम करण्यास सुरुवात केली, सैन्य तैनात केले.'
Jaishankar wraps up visit to Cyprus, Austria after signing agreements on migration, visa, solar alliance
— ANI Digital (@ani_digital) January 3, 2023
Read @ANI Story | https://t.co/SibTvPIQxZ#Jaishankar #Cyprus #Austria pic.twitter.com/dB0KdPeMfG
सीमावादाच्या प्रश्नावर जयशंकर यांचे उत्तर
एका प्रश्नाचे उत्तर देताना परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, भारताने कराराचे पालन केले नाही, असे चीनला म्हणू शकत नाही. चीन भारतावर आरोप करू शकतो, पण सॅटेलाइट इमेजेसमध्ये कोणाची चूक आहे, हे स्पष्टपणे दिसून येते. सीमेवर आधी सैन्य कोणी पाठवले, हे तुम्ही सॅटेलाइट इमेजवरून स्पष्टपणे पाहू शकता. चीनने भारतासोबत केलेल्या कराराचे पालन केले नाही.
तवांग सेक्टरमधील संघर्षानंतर तणाव वाढला
चीनचा भारतीय हद्दीत (India-China Dispute) घुसखोरीचा प्रयत्न भारतीय सैन्याने उलथून लावला. 9 डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्य आणि चिनी सैन्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत मध्ये दोन्ही देशांचे काही जवान जखमी झाले. तेव्हापासून भारत आणि चीनमध्ये तणाव पुन्हा वाढला आहे.