एक्स्प्लोर
RBI ला नवी पाचशे, दोन हजारची एक नोट छापण्यासाठी किती खर्च?
नवी दिल्ली : रिझर्व बँक ऑफ इंडियाला पाचशेची नवी एक नोट छापण्यासाठी 3 रुपये 9 पैसे, तर दोन हजारची नोट छापण्यासाठी 3 रुपये 54 पैसे एवढा खर्च येतो. माहिती अधिकारात ही माहिती समोर आली आहे.
पाचशेच्या एक हजार नोटा छापण्यासाठी 3 हजार 90 रुपये खर्च येतो. पाचशेची जुनी नोट छापण्यासाठी देखील एवढाच खर्च येत होता, अशी माहिती आरबीआयकडून चंद्रशेखर गौड यांनी केलेल्या माहिती अधिकार अर्जानंतर देण्यात आली आहे.
दोन हजारच्या एक हजार नोटा छापण्यासाठी आरबीआयला 3 हजार 540 रुपये लागतात. जुन्या एक हजारच्या नोटांसाठीही एवढाच खर्च येत होता, असं आरबीआयने म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement