एक्स्प्लोर

India : भारतातील प्रसूतीसेवेच्या दर्जात सुधारणा घडवून आणण्यासाठी FOGSI चा NABH सोबत सामंजस्य करार

FOGSI Inks MoU with NABH : शाश्वत विकास उद्दीष्ट्यांबरहुकुम (SDCs) मातामृत्यूंचे प्रमाण कमी करणे आणि भारतामध्ये अधिक सुरक्षित प्रसूतीसाठी आरोग्यव्यवस्था बळकट करणे हे या सामंजस्य कराराचे ध्येय आहे.

FOGSI Inks MoU with NABH : प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्राच्या क्षेत्रात कार्यरत आरोग्यकर्मींचे प्रतिनिधित्व करणारी भारतातील व्यावसायिक संघटना फेडरेशन ऑफ ऑब्सेट्रिशियन्स अँड गायनॅकोलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडियाने (FOGSI) प्रसूतीसेवेच्या दर्जात सुधारणा घडवून आणण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. यामध्ये सरकारचे ध्येय साकारण्यास मदत करण्याच्या हेतूने नॅशनल अॅक्रेडिशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (NABH)/ अधिस्वीकृती आणि दर्जाचा पुरस्कार करणारी भारताची शिखर संस्था क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया (QCI) बरोबर सामंजस्य करार केल्याची घोषणा केली आहे.

दर्जामधील सुधारणेच्या दृष्टीने साधण्यात आलेला हा महत्त्वपूर्ण क्षेत्रीय सहयोग आहे. शाश्वत विकास उद्दीष्ट्यांबरहुकुम (SDCs) मातामृत्यूंचे प्रमाण कमी करणे आणि भारतामध्ये अधिक सुरक्षित प्रसूतीसाठी आरोग्यव्यवस्था बळकट करणे हे या सामंजस्य कराराचे ध्येय आहे. या सामंजस्य करारांतर्गत हॉस्पिटल्स आणि प्रसूतीसेवा पुरविणा-या नर्सिंग होम्सच्या क्लिनिकल दर्जाचे मूल्यमापन केले जाईल. आणि तिथे मातांना प्रसूतीदरम्यान आणि बाळाला जन्म दिल्यानंतरही सातत्यापूर्ण, सुरक्षित आणि सन्मान जपणारी देखभाल दिली जाईल याची खातरजमा केली जाईल. देशातील सर्व MCH केंद्रांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचे आणि त्यांच्या कामकाजाच्या दर्जासाठी प्रमाण निकष निश्चित करण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून हा सहयोग साधण्यात आला असून आपल्या आरोग्यव्यवस्थेमध्ये बदल घडवून आणण्याच्या दिशेने उचललेले हे एक लक्षणीय पाऊल आहे.

पायाभूत स्तरावर दर्जाच्या आवश्यकतेवर भर देताना नॅशनल अॅक्रेडिशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (NABH) चे चेअरमन डॉ. महेश वर्मा म्हणाले, “सर्वोत्कृष्टता जपणारी संस्कृती निर्माण करण्याच्या, आरोग्ययंत्रणेत सुधारणा घडवून आणण्याच्या आणि दर्जामध्ये सातत्यपूर्ण सुधारणा आणि रुग्णसुरक्षेचा पुरस्कार करण्याच्या ध्येयाने आम्ही प्रेरित आहोत. मान्यता या आपल्या प्रमुख उपक्रमाच्या साथीने देशातील प्रसूती आरोग्यसेवेचा दर्जा वाढविण्यासाठी FOGSI बरोबर सहयोग साधत असल्याचा आम्हाला आनंद आहे.”

नॅशनल अॅक्रेडिशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (NABH)चे सीईओ डॉ. अतुल मोहन कोचर म्हणाले, “भारतामध्ये प्रूसतीदरम्यान होणा-या मातामृत्यूंची संख्या जगात सर्वाधिक आहे, त्यामुळे देशात प्रसूतीसेवेच्या दर्जात सुधारणा घडवून आणणे ही काळाची गरज आहे. आरोग्याच्या बाबतीत एकूणच चांगले परिणाम मिळवायचे असतील तर प्रसूतीशी निगडित आरोग्यसेवांच्या प्रमाण दर्जामध्ये सुधारणा घडवून आणणे महत्त्वाचे आहे असे आम्हाला ठामपणे वाटते. FOGSI बरोबर साधलेला हा सहयोग म्हणजे देशभरातील प्रसूतीसेवा परिसंस्था बळकट करण्याच्या दृष्टीने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”

भारतात कोणत्या ना कोणत्या आरोग्यकेंद्रामध्ये होणा-या प्रसूतींमध्ये 2019-21 (NFHS 5) मध्ये वाढ होऊन हे प्रमाण 88.6 टक्क्यांवर पोहोचले आहे. मात्र, अद्यापही भारतातील मातामृत्यूंचे प्रमाण हे जागतिक पातळीवर सर्वाधिक आहे. खरंतर प्रसूतीदरम्यान होणा-या मृत्यूंमध्ये ऑब्स्टेरिक हॅमरेज, गर्भावस्थेशी निगडित जंतूसंसर्ग आणि प्रसूतीदरम्यान उद्भवणा-या हायपरटेन्सिव्ह समस्या यांसारख्या टाळता येण्याजोग्या कारणांमुळे होणा-या मृत्यूंचे प्रमाण ब-यापैकी आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी भारत सरकारने सार्वजनिक आरोग्यकेंद्रांमध्ये दर्जा सुधारणा कार्यक्रम राबवित दर्जेदार प्रसूतीसेवाला अधिकाधिक प्राधान्य देऊ केले आहे. मात्र, ब-याचशा स्त्रिया प्रसूतीसाठी खासगी हॉस्पिटल्सची निवड करत असल्याने स्त्रियांना दर्जेदार प्रसूतीसेवा पुरविण्याच्या बाबतीत खासगी क्षेत्रही महत्त्वाकची भूमिका बजावते. यातून आरोग्यसेवा पुरविणा-या खासग संस्थांमधून पुरविल्या जाणा-या प्रसूतीसेवांच्या दर्जावर देखरेख ठेवणा-या राष्ट्रीय यंत्रणेची व त्यायोगे प्रसूतीदरम्यान स्त्रीचे आरोग्य जपण्याच्या बाबतीत सुधारणा घडवून आणण्याची गरज अधोरेखित होते.

ही दरी भरून काढण्यासाठी FOGSI द्वारे 2013 पासून मान्यता हा उपक्रम राबविला जात आहे. हा उपक्रम जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अँटेनेटल, इट्रापार्टम आणि पोस्टपार्टम देखभालीच्या दर्जाच्या निकषावर आधारित आहे. म्हणूनच NABH आणि FOGSI यांच्यातील हा क्षेत्रीय सहयोग अधिकाधिक मातांपर्यंत पोहोचण्यासाठीच्या आणि अधिक लक्षणीय परिणाम घडवून आणण्यासाठीच्या एकमेकांच्या प्रयत्नांना पूरकतेची जोड देत प्रसूतीआरोग्याच्या परिसंस्थेमध्ये अंतर्बाह्य बदल घडवून आणू शकेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Marathi : 6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Malad Flyover Inagruation : लोकोपयोगी प्रकल्प सोयीसाठी की श्रेयासाठी ?DSuraj Chavan : बुक्कीत टेंगुळ देत सूरज चव्हाण ठरला विजेताABP Majha Headlines :  11 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सShivsmarak Special Report :  समुद्रातलं शिवस्मारक कुठे आहे ? छत्रपती संभाजीराजेंची विधानसभेवर नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bigg Boss Marathi : 6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Embed widget